शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

पाच लाख क्विंटल तुरीचे मातेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:49 IST

जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ८ एप्रिलपर्यंत ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असली तरी किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. १८ एप्रिल ही डेडलाइन देण्यात आली. यामध्येही तीन सार्वजनिक सुट्या आल्याने केंदे्र बंद राहतील. उर्वरित पाच दिवसांत पाच लाख क्विंटल तूर खरेदी अशक्यप्राय असल्याने ३९ हजार शेतकºयांना तुरी व्यापाऱ्यांनाच बेभाव विकाव्या लागणार आहेत.

ठळक मुद्देकेंद्रांना १८ एप्रिलची डेडलाईन : पाच दिवस हाती, ३९ हजार शेतकऱ्यांची खरेदी बाकी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील १२ केंद्रांवर ८ एप्रिलपर्यंत ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असली तरी किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी बाकी आहे. १८ एप्रिल ही डेडलाइन देण्यात आली. यामध्येही तीन सार्वजनिक सुट्या आल्याने केंदे्र बंद राहतील. उर्वरित पाच दिवसांत पाच लाख क्विंटल तूर खरेदी अशक्यप्राय असल्याने ३९ हजार शेतकºयांना तुरी व्यापाऱ्यांनाच बेभाव विकाव्या लागणार आहेत.जिल्हा तूर उत्पादकतेच्या एकूण २५ टक्के प्रमाणातच तूर खरेदी करावी, असे स्पष्ट निर्देश सरव्यवस्थापकांनी सर्व ‘डीएमओं’ना दिलेत. यामुळे सद्यस्थितीत ६१,९२७ शेतकऱ्यांची आॅनलाइन नोंदणी झाली असली तरी प्रत्यक्षात २३,०१७ शेतकऱ्यांची ३.६० लाख क्विंटल तूर खरेदी करण्यात आल्याचे वास्तव आहे. यंदाच्या हंगामात साधारणपणे १ लाख १० हजार हेक्टर तुरीचे क्षेत्र होते व कृषी विभागाने हेक्टरी सरासरी उत्पादकता १३.५० क्विंटल जाहीर केली.शनिवारी ८६१ क्विंटल तूर खरेदीजिल्ह्यात यंदा १४.८५ लाख क्विंटल तुरीचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. यापैकी सहा ते सात लाख क्विंटल तूर नाफेडच्या दिरंगाईमुळे खासगी बाजारात विकल्या गेली असली तरी अद्याप शेतकऱ्यांच्या घरात किमान पाच लाख क्विंटल तूर पडून आहे. आता तूर खरेदीला पाचच दिवस बाकी आहे. जिल्ह्यात सध्या गोडाऊनचा अभाव असल्याने तूर खरेदी मंदावली आहे. ७ तारखेला आठ केंद्रांवरील तूर खरेदी निरंक आहे. उर्वरित चार केंद्रांवर फक्त ८६१ क्विंटल खरेदी करण्यात आली.जिल्ह्यातील बाराही केंद्रावर तूर खरेदीच्या नावावर निव्वळ टाईमपास सुरू आहे. गतवर्षी दरदिवशी १५ ते २० हजार क्विंटल खरेदी होत असताना यंदा मात्र केविलवानी स्थिती निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसांत किमान पाच लाख क्विंटल तूर खरेदी करणे अशक्य असल्याने या तुरीच्या घुगऱ्या कराव्यात काय, असा शेतकºयांना संतप्त सवाल आहे.अशी आहे केंद्रनिहाय खरेदीच्अचलपूर केंद्रावर ३२,५५५, अमरावती ५२,७३५, अंजनगाव सुर्जी १९,९२१, चांदूरबाजार २९,०८२, चांदूर रेल्वे २९,२६२, दर्यापूर ५६८७५, धारणी ७,०१२, नांदगाव खंडेश्वर १७,४३२, तिवसा १७,९९६ ,धामणगाव २४,९९०, मोर्शी ३७,१०२ व वरुड तालुक्यात ३४,१७३ क्विंटल खरेदी करण्यात आली.तूर साठवणुकीसाठी गोदामांची कमतरता आहे, तर हरभरा खरेदीबाबत ग्रेडर कमी आहेत. आता ग्रेडर उपलब्ध होतील व बुटीबोरीचे गोदामदेखील उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मुदतीपूर्वी अधिकाधिक तूर खरेदीचा प्रयत्न राहील.- रमेश पाटील, डीएमओ