लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : शहरातील धारणी-परतवाडा मार्गावरील हरिहरनगर परिसरातील पाच घरे चोरट्यांनी बुधवारी रात्री फोडली. आतापर्यंत एकाचीच तक्रार धारणी पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, चोरट्यांनी येथून ३३ हजारांचे साहित्य लंपास केले.प्राप्त माहितीनुसार, हरिहरनगर परिसरात शोभा कोकाटे, सचिन आडे, गेंदालाल देशमुख, राजेश राठोड, थाठे गुरुजी या पाच जणांची कुलूपबंद घरे चोरट्यांंनी बुधवारी मध्यरात्री फोडली. यापैकी शोभा कोकाटे यांनीच पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या घरातून १० हजारांचे चार ग्रॅमचे मंगळसूत्र, रोख तीन हजार रुपये व २० हजारांची एमएच २७ बीटी ६८९७ क्रमांकाची दुचाकी असा एकूण ३३ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. उर्वरित चार घरमालक गावाबाहेर असल्याने नेमका किती मुद्देमाल चोरट्यांनी पळविला, हे गुलदस्त्यात आहे.
धारणीत एकाच रात्री पाच घरफोड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 23:34 IST
शहरातील धारणी-परतवाडा मार्गावरील हरिहरनगर परिसरातील पाच घरे चोरट्यांनी बुधवारी रात्री फोडली. आतापर्यंत एकाचीच तक्रार धारणी पोलीस ठाण्यात दाखल झाली असून, चोरट्यांनी येथून ३३ हजारांचे साहित्य लंपास केले.
धारणीत एकाच रात्री पाच घरफोड्या
ठळक मुद्देचोरट्यांचा धुमाकूळ : बंद घरे फोडली