शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

पाच कर्मचारी निलंबित, एक कंत्राटी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 23:23 IST

पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, शनिवारी पाच महापालिका कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आयुक्त संजय निपाणे यांनी त्याबाबतचे आदेश शनिवारी जारी केले. पाच कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एका कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षकाला बडतर्फ करण्यात आले आहे. निलंबितामध्ये एक ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, एक स्वास्थ्य निरीक्षक, दोन बिटप्यून व एका कनिष्ठ लिपिकाचा समावेश आहे. नीलेश गाडे असे बडतर्फ करण्यात आलेल्या कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षकाचे नाव आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या पाहणीदौऱ्याचा ‘इफेक्ट’ : दोघांचे निलंबन टळले

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, शनिवारी पाच महापालिका कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. आयुक्त संजय निपाणे यांनी त्याबाबतचे आदेश शनिवारी जारी केले. पाच कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त एका कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षकाला बडतर्फ करण्यात आले आहे. निलंबितामध्ये एक ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक, एक स्वास्थ्य निरीक्षक, दोन बिटप्यून व एका कनिष्ठ लिपिकाचा समावेश आहे. नीलेश गाडे असे बडतर्फ करण्यात आलेल्या कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षकाचे नाव आहे.आठ कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, तर तिघांची बदली करण्यात आली. अख्खे शहर डेंग्यूने कह्यात घेतल्याच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी शहरातील विविध भागात जाऊन अस्वच्छतेची पाहणी केली होती. पाहणीदरम्यान प्रभागासह सुकळी कंपोस्ट डेपोतील ट्रक व कंटेनरच्या नोंदीमध्ये अनियमितता असल्याचे गंभीर निरीक्षण त्यांनी नोंदविले. त्याचवेळी सर्व संबंधितांचे निलंबन व अन्य कारवाईचे आदेश त्यांनी आयुक्त संजय निपाणे यांना दिले होते. बरहकूम स्वच्छता विभागाने शुक्रवारी ७ कर्मचाऱ्यांचे निलंबन, तर आठ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडे प्रस्तावित केली. त्यावर आयुक्त निपाणे यांनी शनिवारी दुपारी स्वाक्षरी करून अंतिम शिक्कामोर्तब केले. निलंबितामध्ये शेगाव रहाटगाव प्रभागातील बिटप्यून विनोद खोडे, जमिल कॉलनी प्रभागाचे स्वास्थ्य निरिक्षक संजय घेंगट व बिटप्यून संदीप सारसर, सुकळी कंपोस्ट डेपोतील कनिष्ट लिपिक नरेश उईके व ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक किशोर संगेले यांचा समावेश आहे. संगेले हे गुरुवारी पूर्वसूचना न देता गैरहजर होते. त्यांनाही निलंबित करण्यात आले. ज्या चार बिटप्यून, स्वास्थ्य निरीक्षक व कनिष्ठ लिपिकाला निलंबित करण्यात आले, त्या प्रभागात व सुकळी कंपोस्ट डेपोला पालकमंत्र्यांनी भेट दिली होती.कारवाईत गौडबंगाल !स्वच्छता विभागाने शुक्रवारी ७ कर्मचाºयांचे निलंबन प्रस्तावित केले होते. मात्र, विभागाने प्रस्तावित केल्यानुसार, त्यात सुकळी कंपोस्ट डेपोतील कनिष्ठ लिपिक गोपाल घुरडे व बिटप्यून संजय वाघोळकर यांचा समावेश होता. मात्र, आश्चर्यकारकरीत्या शनिवारी निघालेल्या निलंबन आदेशातून दोन नावे वगळण्यात आली. वाघोळकर व घुरडे यांचे निलंबन न करता पैकी एकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. घुरडे यांना बदलीचे अभय देण्यात आले. गैरहजर असलेले संगेले यांना कारणे दाखवा नोटीस प्रस्तावित केली असताना त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आयुक्त संजय निपाणे यांनी स्वच्छता विभागाने प्रस्तावित केलेली निलंबनाची कारवाई मागे का घेतली, याबाबत संशयकल्लोळ उठला आहे. याबाबत स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांनी समर्पक प्रतिसाद दिला नाही.यांना बजावली कारणे दाखवा नोटीसस्वास्थ्य निरीक्षक श्रीकांत डवरे, कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षक महेश पळसकर, ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षक आय.आर.खान , सिध्दार्थ गेडाम व राजू डिक्याव व बिटप्यून संजय वाघोळकर, नरेंद्र डूलगज व सुनिता राजेश धवसेल यांना निलंबित का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. सुकळी कंपोस्ट डेपोतील कनिष्ठ लिपिक गोपाल घुरडे यांची क्रीडा विभागात दिनेश निंधाने यांची नवसारी प्रभागात व कंत्राटी स्वास्थ्य निरीक्षक परीक्षित गोरले यांची प्रभाग-२ मध्ये बदली करण्यात आली.प्रशासनाकडून लपवाछपवीशनिवारी केलेल्या निलंबन, बदली व अन्य कारवाईबाबत प्रचंड गोपनियता बाळगली गेली. केवळ कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाºयांची नावे तितकी कार्यालय अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांनी व्हॉट्सग्रुपवर टाकली. कारवाईबाबतचे आदेश देण्यास मिसाळांनी असमर्थतता दर्शविली. स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांच्या हस्ताक्षरातील १५ नावांची यादी प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली. अधिकृतरीत्या जनसंपर्क तथा सामान्य प्रशासन विभाग किंवा आयुक्त कार्यालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली नाही. आयुक्तांशी संपर्क होऊ शकला नाही.