नवे फायर स्टेशन : अद्ययावत साहित्य खरेदी होणारअमरावती : महानगराची वाढती लोकसंख्या बघता अग्निसुरक्षेसाठी विविध उपाययोजना करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने चालविली आहे. शहरात नव्या फायर स्टेशनच्या निर्मितीसह वाहने, अद्ययावत संयत्र खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. राज्य शासनाकडे पाच कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे.नगरविकास विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना नियम लागू करुन नागरिकांना अग्निसुरक्षा प्रदान करावयाची आहे. राज्य शासन ‘ड’ वर्गीय महापालिकांना अग्निसुरक्षा अभियान राबविण्यासाठी अनुदान देणार आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार अग्निशमन केंद्राची उभारणी, यंत्रसामुग्रीची खरेदी करण्याची मुभा असेल. शासन अनुदानातून ई-निविदा प्रक्रियेतून साहित्याची खरेदी करता येईल.अकोली, रहाटगाव परिसरात अग्निश्मन केंद्रनव्याने अग्निशमन केंद्र साकारण्याचे प्रस्तावित असून अकोली किंवा रहाटगावात हे केंद्र निर्माण केले जाईल. त्याअनुषंगाने प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. तसेच दोन वाहने, संयत्रे खरेदी करुन अग्निशमन सेवांशी निगडीत पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्याबाबत महापालिकेचे धोरण आहे.
अग्निसुरक्षेसाठी पाच कोटींचा प्रस्ताव
By admin | Updated: February 1, 2016 00:13 IST