शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबारात आदिवासी जखमी; मेळघाटात संघर्ष चिघळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 06:15 IST

मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या गावांतील आदिवासी आणि वनखात्यातील संघर्ष कालच्या घटनेनंतर अधिकच चिघळला

चिखलदरा/धारणी (अमरावती) : मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात असलेल्या गावांतील आदिवासी आणि वनखात्यातील संघर्ष कालच्या घटनेनंतर अधिकच चिघळला असून, बुधवारी वन संरक्षकांनी केलेला गोळीबार व मारहाणीत २५ ते ३० आदिवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना अमोना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तेलपानीसह आठ पुनर्वसित गावांमधील आदिवासींनी जंगलातील त्यांच्या मूळगावी आठवडाभरापूर्वी बस्तान मांडले. त्यांना जंगलाबाहेर काढण्यासाठी वनविभागाने कंबर कसली आहे. वनाधिकारी व आदिवासी यांच्यातील चर्चा फिस्कटल्याने मंगळवारी सशस्त्र संघर्ष झाला. त्यामुळे येथील जंगलात लावण्यात आलेली आग धगधगत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.चिखलदरा तालुक्यातील तेलपाणी या आदिवासीे गावातील नागरिकांचे अकोट तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, तेथे पायाभूत सुविधा नाहीत. मोबदल्यातील शेती आणि पूर्ण आर्थिक साहाय्य अदिवासींना मिळालेले नाही. त्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास विभागीय वनसंरक्षकांच्या नेतृत्वाखालील पथकाने तेलपानी येथील आदिवासींना जंगलाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आदिवासी बधले नाहीत. त्यामुळे गोळीबार करण्यात आला. त्यात चंपालाल लाभू बेठेकर यांच्यासह काही आदिवासी जखमी झाले. जखमी चंपालाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वनखात्याचे कर्मचारी आदिवासींवर जबरदस्ती करत आहेत. आदिवासींचा रहिवास असलेल्या जंगलास आग लावण्यात आली असून साहित्याची नासधूस करण्यात आली आहे. आदिवासी युवकांच्या १० दुचाकी पेटविल्या, तर २० दुचाकी जप्त केल्या. लाठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.चर्चेतून तोडगा निघाला नाहीपुनर्वसनस्थळी आदिवासींनी परत जावे, यासाठी त्यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मेळघाटचे माजी आमदार राजकुमार पटेल यांना संबंधित गावांमध्ये पाठविले आहे. पटेल यांच्या सोबतीला उपविभागीय अधिकारी आणि पोलीसांचा ताफा आहे. पटेल यांनी अमोना कासोद येथील आदिवासींशी चर्चा केली, पण चर्चेतून कुठलाही तोडगा निघाला नाही.अनेक कुटूंब परांगदा!आदिवासी ग्रामस्थ वनखात्याच्या प्रचंड दहशतीखाली आहेत. दहशतीमुळे मुले, महिला व वृद्ध असे एकूण २० पेक्षा अधिक आदिवासी बेपत्ता झालेत. त्यांची माहिती अद्यापही मिळालेली नाही. बेपत्ता झालेल्यांमध्ये सोमठाणा येथील पसरराम दादू कासदेकर, त्यांच्या पत्नी व एक वर्षाचा मुलगा, बालकराम शंकर बेठेकर, पत्नी व मुलगा, मोती सानू कासदेकर, धारगड येथील बापूराव मान्सू सावलकर, सुरेंद्र हिरालाल कासदेकर, हिरा मावसकर, तेलपानी येथील हिराय फालतू कासदेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, जखमी चंपालाल बेठेकर यांना अमोना कासोद येथे आणण्यात आले. मारहाणीत २५ ते ३० आदिवासी महिला-पुरुष जखमी झाले आहेत. त्यांनाही अमोना येथे हलविण्यात आले आहे.

टॅग्स :Firingगोळीबार