शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

प्रथमेशवर शस्त्रक्रिया, आई-वडील नि:शब्दच!

By admin | Updated: August 9, 2016 23:54 IST

पिंंपळखुटा येथील संत श्री शंकर महाराज विद्यामंदिरात रक्ताच्या थारोळ्यात आढळलेला चिमुकला प्रथमेश अद्यापही बेशुद्ध आहे.

संत श्री शंकर महाराज विद्यामंदिर : घातपाताचा संशय, दोषींवर कठोर कारवाईची मागणी अमरावती : पिंंपळखुटा येथील संत श्री शंकर महाराज विद्यामंदिरात रक्ताच्या थारोळ्यात आढळलेला चिमुकला प्रथमेश अद्यापही बेशुद्ध आहे. नागपूर शहरातील एका खासगी इस्पितळात त्याच्यावर सोमवारी रात्री शस्त्रक्रिया झाली. प्रथमेशची मृत्यूशी झुंज सुरू आहे. पोटच्या गोळ्याची अचानक अशी अवस्था पाहून त्याचे आई-वडिल नि:शब्द झाले आहेत. दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी नागपूर येथे गेलेले मंगरूळ दस्तगिर पोलीस रिकाम्या हातानेच परतले. १०-११ वर्षांचा चिमुकला प्रथमेश. अमरावती येथील सूर्यभान सगणे यांचा मुलगा. आई-वडिलांचा मजुरीवरच उदरनिर्वाह. मात्र, प्रथमेशला उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी त्यांचा खटाटोप चाललेला. त्यांनी धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील संत श्री शंकर महाराज विद्यामंदिराच्या व्यवस्थापनावर त्यांचा गाढा विश्वास. म्हणूनच या विद्यामंदिरात त्यांनी प्रथमेशला प्रवेश दिला. तेथील वसतिगृहातच तो राहू लागला. विश्वासातच घात झाला. अभ्यासात अत्यंत हुशार असलेल्या लहानग्या प्रथमेशच्या आई-वडिलांना उभ्या ठाकलेल्या संकटाची कल्पना नव्हती. पण, रविवार उगवला तो अकल्पित घेऊनच. घातपाताचा संशयअमरावती : गळा चिरलेल्या अवस्थेत प्रथमेश विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निपचित पडलेला आढळला. सारेच हादरले. त्याला जिल्हा सामान्य रूग्णालयात आणि नंतर नागपूरला हलविण्यात आले. घटना भयंकर होती. आई-वडिलांचा तर श्वासच अडकला. अनेक चर्चा सुरू झाल्या. कुणी म्हणाले, चिमुकल्या प्रथमेशने आत्महत्येचा प्रयत्न केला. कुणी म्हणाले तो वरून पडला. पण, या दोन्ही शक्यता जन्मदात्यांना मान्य नाहीत. त्यांना घातपाताचा संशय आहे. ज्याने कुणी चिमुरड्या प्रथमेशची ही अवस्था केलीय, त्याला कठोर शासन व्हावे, इतकेच सगणे कुटुंबाचे म्हणणे आहे. नागपूरच्या खासगी इस्पितळात शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रथमेशचा धोका टळलाय. बेशुद्ध असला तरी सात दिवसांनी त्याची जखम बरी होईल आणि हळूहळू तो पूर्ववत होईल. परंतु या घटनेमुळे झालेला कुठाराघात पचविण्याची सध्या तरी सगणे दाम्पत्याची मानसिकता नाही. या घटनेमुळे शिक्षणासाठी घरापासून लांब, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वसतिगृह अधीक्षकासह दोघांची चौकशीसमाज कल्याण विभागाद्वारे चालविण्यात येणाऱ्या संत शंकर महाराज विद्यामंदिर परिसरातील या वसतिगृहाचे अधीक्षक दिलीप मोहिजे, चतुर्थश्रेणी कर्मचारी नीलेश सहारे, मदतनीस बंटी मोहिजे यांना ताब्यात घेऊन मंगरूळ दस्तगिर पोलिसांनी तब्बल बारा तास चौकशी केली. या चौकशीत अनेक प्रश्नांचा उलगडा होणे अपेक्षित होते. मात्र, पोलीस प्रशासनाने चौकशीचा तपशिल सांगण्यास सांगण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या घटनेचे नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. रित्या हाताने परतले पोलीसगंभीर अवस्थेत नागपूर येथील खासगी रूग्णालयात प्रथमेशला दाखल केल्यानंतर तब्बल चार तासांनी अमरावती कंट्रोल रूममधून मंगरूळ पोलिसांना याप्रकरणाची माहिती देण्यात आली. पश्चात मंगरूळचे पीएसआय एस़व्ही़ ठावरे व हेड कॉन्सटेबल त्र्यंबक काळे नागपूरकडे रवाना झाले. तेथे त्यांनी प्रथमेशची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अतिदक्षता कक्षात दाखल असल्यामुळे त्यांना प्रथमेशचे बयाण नोंदविता आले नाही. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात कुचराई शाळा व वसतिगृह परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश शिक्षण विभागाने यापूर्वीच दिले आहेत. येथून नजीकच असलेल्या संत शंकर महाराज विश्वधाम मंदिर परिसरात कॅमेरे लावण्यात आले. वसतिगृह आणि शाळा परिसरात कॅमेरे लावताना कुचराई करण्यात आली. या शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे असते तर पोलिसांना तपासात मदत झाली असती. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे काय ?शाळा-महाविद्यालयांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी त्या-त्या व्यवस्थापनावर असते. मात्र, संत श्री शंकरमहाराज विद्यामंदिर व्यवस्थापनाच्या लक्षात बराच वेळाने ही बाब आली. सुटी असल्याने नेमका प्रकार कसा घडला, हे देखील कळले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.लहान मुलांच्या भांडणातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी चौकशीतून निष्पन्न होत आहे. मात्र, अद्याप नेमके कारण कळले नाही. चौकशी सुरू आहे. लवकरच तथ्य बाहेर येईल. -श्रीनिवास घाडगे, एसडीपीओ, चांदूररेल्वेप्रथमेशच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याचेच बयाण ग्राह्य धरले जाईल. त्यानंतरच यातील सत्य बाहेर येईल. -शैलेंद्र शेळके, ठाणेदार, मंगरूळ दस्तगिर पोलीस ठाणे