शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तिवस्यातही प्रथमच नाफेडचे केंद्र सुरू

By admin | Updated: May 17, 2017 00:02 IST

जिल्हात सर्वत्र नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाले असताना तिवसा येथे केंद्र सुरू न केल्याने ....

पणन संचालकांची कानउघाडणी : काँग्रेसच्या आंदोलनाला यश लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : जिल्हात सर्वत्र नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाले असताना तिवसा येथे केंद्र सुरू न केल्याने आ. यशोमती ठाकूर यांनी पणन् संचालकांसह जिल्हाधिकाऱ्यांना धारेवर धरले. तालुका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील आंदोलनाचा इशारा दिला. अखेर प्रशासनाने मंगळवारी नाफेडचे खरेदी केंद्र सुरु केले. येथे आ. यशोमतींच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची तूर खरेदी सुरु करण्यात आली.तिवसा येथे नाफेडची खरेदी नसल्याने व्यापाऱ्यांद्वारे शेतकऱ्यांची तूर बेभाव खरेदी करण्यात येत होती. अन्य केंद्रांवर तूर विक्रीसाठी नेल्यास शेतकऱ्यांना अर्थिक भुर्दंड सोसावा लागत होता. त्यामुळे तिवसा बाजार समिंतीच्या आवारातच शासकीय तूर खरेदी केंद्र सुरु करावे, अशी मागणी आ.यशोमती ठाकूर यांनी लाऊन धरली व रस्त्यावर उतरण्याचा ईशारा प्रशासनाला दिला. आंदोलनाच्या धसक्याने मंगळवारी डीएमओद्वारा शासकीय तूर खरेदी सुरु करण्यात आली. यावेळी बाजार समिती सभापती रामराम तांबेकर, उपसभापती कमलाकर वाघ, संचालक संजय वै. देशमुख, जिल्हा बँक संचालक सुरेश साबळे, तिवसा नगर पालिका उपाध्यक्ष वैभव वानखडे, संचालक गजानन देशमुख, प्रदीप बोके, योगेश वानखडे, गोपाल बिजवे, तुकाराम भोयर, रणजित राऊत, चर्जन, नाफेडचे मार्केटिंग अधिकारी देशमुख, सचिव रोंघे, तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, पं.स. सदस्य लुकेश केने, श्याम देशमुख, प्रफुल्ल देशमुख, सुरेंद्र साबळे, शहराध्यक्ष अतुल देशमुख, माजी सभापती देवीदास डेहणकर, सरपंच बबलू मक्रमपुरे, युकाँ उपाध्यक्ष मुकुंद पुनसे, युकाँ अध्यक्ष सागर राऊत, सेतू देशमुख, अंकुश बनसोड, आशिष ताथोडे, अतुल अंबुलकर आदी उपस्थित होते. पहिल्याच दिवशी बाजार समितीत ८०० क्विंटलची आवक झाली. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.दर्यापुरात नाफेडच्या खरेदीला सुरुवात दर्यापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बाजार समितीच्या यार्डामध्ये नाफेडची नव्याने खरेदी सुरू करण्यात आली आहे. १५ मेपर्यंत बाजार समितीमध्ये १२ हजार ८९१ क्विंटलची आवक झालेली आहे. सोमवारपासून नव्याने तूर खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती बाबासाहेब बरवट, उपसभापती न.प्र. ब्राह्मणकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मधूभाऊ तराळ, मापारी हमाल संघाचे सदरोद्दीन शमशोद्दिन यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.