सुमित हरकुट ।आॅनलाईन लोकमतचांदूर बाजार : बहिरम यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी रिंगण सोहळा रंगला. पंचक्रोशीतील पालखी दिंडीसह हजारो भाविक सोहळ्यात सहभागी झालेत. रिंगणात अग्रस्थानाचा मान असणारे माऊलींचे अश्व पाहण्यासाठी व दिंडी सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थित होती. ६० हजार वारकºयांच्या टाळमृदंगाच्या गजराने बहिरमच्या आसंमतात निनादत होता.नवसाला पावणारा म्हणून बहिमरमबुवाची ख्याती आहे. याच श्रद्धेतून नवस फेडण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक बहिरामबुवाच्या चरणी नतमस्तक होतात. यंदा आळंदी येथील संजय आलोने महाराज यांच्या वाणीतून संगीतमय भागवत सप्ताहाचे आयोजन बहिरम यात्रेमध्ये करण्यात आले आहे. सात दिवस चालणाऱ्या या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रबोधन करणार आहेत. चांदूर बाजार तालुक्यातील १५ वारकरी दिंड्यांनी हजेरी दर्शविली. यामध्ये भक्तीधाम चांदूर बाजार येथील पालकी तसेच प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांच्या पादुका पालखीत बहिरमपर्यंत आणण्यात आल्या.चांदूरबाजार तालुक्यातील आखतवाडा, सर्फापूर, करजगाव, लाखनवाडी, येवता, नायगाव या गावातील वारकरी मंडळी व दिंडी या रिंगण सोहळ्यात उपस्थित होती. या संपूर्ण रिगण सोहळ्याचे छायाचिीत्रकरण अनेकांनी डोळ्यासह मोबाईल, ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून साठविले. अमरावती जिल्ह्यातील सर्वाधिक काळ म्हणजेच एक महिना चालणारी ही बहिरम यात्रा संत गाडगेबाबांच्या कार्यकाळात प्रसिद्ध झाली आहे.वाहतूक खोळंबलीशिरजगाव कसबाकडून बहिरमकडे येत असताना कारंजा ते बहिरम अशी भरगच्च वाहनांची रांग लागली होती. पार्किंगसाठी एक तास भाविक ट्रॅफिकमध्ये अडकले होते. वाहनांच्या गर्दीतून पादचाºयांना वाट काढताना अडचण निर्माण झाली.रोडग्यांचा घेतला स्वादरविवार हा सुटीचा दिवस असल्याने जिल्ह्यासह विदर्भातील भाविकांनी गर्दी केली होती. रोडगे व हंडीतील मटणाचा आस्वाद घेतला. अनेकांना स्वयंपाक करण्यासाठी जागा उपलब्ध झाली नसल्याने त्यांनी खुल्या आवरात चूल मांडली.रविवारी सुमारे ८० हजार भाविकांनी उपस्थिती लावली. बहिरमकडे येणारे सर्व रास्त्यांवर भाविकांचे लोंढे दिसत होते. बाजारातही चांगलीच गर्दी झालेली होती. खºया अर्थाने यात्रा रंगात आल्याची चर्चा बहिरममध्ये होती.
बहिरम यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच रिंगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:04 IST
बहिरम यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी रिंगण सोहळा रंगला. पंचक्रोशीतील पालखी दिंडीसह हजारो भाविक सोहळ्यात सहभागी झालेत.
बहिरम यात्रेच्या इतिहासात पहिल्यांदाच रिंगण
ठळक मुद्देमाऊलींच्या अश्वाचे आकर्षण : सोहळ्यासाठी भाविकांची उत्स्फूर्त गर्दी