शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत प्रथमच प्रकल्पात साठा कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:34 IST

यंदा सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत.

ठळक मुद्देधोक्याची घंटा : मध्यम, लघु प्रकल्पांनी वाढविली चिंता

आॅनलाईन लोकमतअमरावती : यंदा सरासरीपेक्षा ३४ टक्के कमी झालेल्या पावसाचे परिणाम आता जाणवायला लागले आहेत. ऐन थंडीत जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पात सरासरी ६७ टक्के जलसाठा आहे. गत पाच वर्षांच्या तुलनेत प्रकल्पामध्ये यंदा सर्वात कमी जलसाठा आहे. मध्यप्रदेशातून पाण्याची आवक झाल्याने केवळ उर्ध्व वर्धा व पूर्णा प्रकल्पात ७५ टक्कयांपर्यत साठा आहे.जिल्ह्यात उर्ध्व वर्धा हा एकमेव मुख्य प्रकल्प आहे. सद्यस्थितीत या प्रकल्यात समाधानकारक साठा आहे. मध्यम चार प्रकल्प आहेत. यामध्ये सरासरी ६७ टक्के साठा आहे. यामध्ये जर १० टक्के मृतसाठा व आगामी बाष्पीभवन गृहीत धरल्यास जिल्ह्याची तहान भागविण्यास हा साठा अपुरा ठरणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील किमान ७०० गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचणार आहे अश्याव९रळी प्रकल्यातील पाणीसाठा देखील कमी होणार असल्याने जिल्ह्यात पाण्याची चांगलीच टंचाई जानवणार, अशी स्थिती निर्माण झाली आहे.जलसंपदा विभागाच्या सोमवारच्या अहवालानुसार उर्ध्व वर्र्धा प्रकल्पात ३९७.५५ टिएमसी म्हणजेच ७०.४८ टक्के साठा आहे.परतीच्या पावसाच्या काळात मध्यप्रदेशातून पावसाची आवक वाढल्याने उर्ध्व वर्धा व पूर्णा या प्रकल्पात पाण्याची पातली वाढली होती. मात्रशहानूर प्रकल्पात सद्यस्थितित ६२ टक्के, पूर्णा प्रकल्पात ७७.४२ टक्के तर चंद्रभागा प्रकल्पात ६८.४८ टक्के तर सपन प्रकल्पात २७.८७ टिएमसी म्हणजेच २८.१२ टक्के जलसाठा आहे. या मध्यम प्रकल्पात एकूण ८२.९० टीएमसी साठा व ६७ टक्के साठा आहे. मागील वर्षी या सर्व प्रकल्पात याच तारखेला ८३.०४ टीएमसी, २०१४ मध्ये ९७.३३ टीएमसी, २०१३ मध्ये १११.३१ टीएमसी, तर २०१२ मध्ये ८६.८९ टीएमसी साठा होता. त्यामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा सर्वात कमी पाणीसाठा आहे. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा आहे.लघु प्रकल्पात ४१ टक्केच साठाजिल्ह्यात एकूण ४६ लघुु प्रकल्प आहेत. यामध्ये सद्यस्थितीत ४१. ४७ टक्केच जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये याच तारखेला ६२.६८ टक्के, २०१६ मध्ये ६७.९२ टक्के, २०१५ मध्ये ७६.११ टक्के, २०१३ मध्ये ६९.०५ टक्के, तर २०१२ मध्ये ६७.६६ टक्के साठा शिल्लक होता. यंदा मात्र सरासरीपेक्षा कमी पावसामुळे मागील पाच वर्षांच्या तुलनेत सर्वात कमी साठा आहे.