शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पहिलीने सोडले, दुसरी फसली; तिसरी नांदण्यावर ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 22:44 IST

वडाळीतील २३ वर्षीय अंध तरुण व नागपुरातील बजाजनगर येथील अंध युवतीच्या प्रेमप्रकरणाने नवे वळण घेतले आहे. त्याचे हे तिसरे लग्न असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले.

ठळक मुद्देअंध तरुणाचा प्रताप : फ्रेजरपुरा ठाण्यात पोहोचले प्रकरण, तूर्तास दोघे एकत्र

अमरावती : वडाळीतील २३ वर्षीय अंध तरुण व नागपुरातील बजाजनगर येथील अंध युवतीच्या प्रेमप्रकरणाने नवे वळण घेतले आहे. त्याचे हे तिसरे लग्न असल्याचे पोलीस चौकशीत पुढे आले. एवढेच नव्हे तर त्याच्याविरुद्ध दुसरी पत्नी न्यायालयात गेली आहे. तरीही तिसरी पत्नी त्याच्यासोबत राहण्यास ठाम आहे. दोघेही सज्ञान असल्याने फ्रेजरपुरा पोलिसांनी तूर्तास कोणतीही कारवाई न करता त्यांना मुक्त केले आहे.फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडाळी परिसरात राहणारा अंध युवक प्रवीण सिद्धार्थ तायडे (२३) याची पहिली बायकोदेखील अंध होती. ती काही दिवसांत त्याला सोडून गेली. यानंतर दुसरीला प्रेमजाळ्यात अडकवून लग्न केले. मात्र, छळ व फसगत होत असल्याचे पाहून तिनेही सोडून दिले. त्याने नागपूरहून पळविलेल्या व विवाह केलेल्या तिसºया तरुणीच्या आईने मुलगी हरविल्याची तक्रार केली होती.‘ती’ त्याच्यासोबतच राहणारनागपूरच्या बजाजनगर पोलिसांनी प्रवीणला त्याच्या तिसºया पत्नीसह २० जानेवारी रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली. दोघेही सज्ञान व विवाहबद्ध असल्यामुळे पोलिसांना त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, सोमवार, १२ फेब्रुवारी रोजी पुन्हा या प्रकरणाला नवीन कलाटणी मिळाली. तो अंध पत्नीला घेऊन फे्रजरपुरा ठाण्यात पोहोचला तोच मुलीची आई आणि प्रवीणची दुसऱ्या क्रमांकाची पत्नी आईवडिलांसह ठाण्यात पोहोचली. ती लग्नापूर्वी जेथे वास्तव्यास होती, ते वसतिगृह चालविणारे पीआर पाटील अपंग एकात्मिक विकास शैक्षणिक व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पंजाब पाटीलसुद्धा सोबत होते. त्यांच्यासमक्ष प्रवीणचा दुसरा विवाह झाला होता. प्रवीणची छळकथाच तिने पोलिसांपुढे मांडली. तो कशाप्रकारे अंध मुलींना प्रेमजाळ्यात अडकवितो, पैशांच्या हव्यासापोटी फसवितो, हे तिने सांगितले. यावेळी प्रवीणच्या तिसऱ्या पत्नीने मात्र त्याच्यासोबत राहण्याची इच्छा पोलिसांकडे व्यक्त केली. त्यामुळे तिची आई हताश होऊन परतली. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकल्यानंतर प्रवीण व त्याच्या तिसऱ्या पत्नीचे बयाण नोंदवून त्यांची मुक्तता केली.प्रवीण करायचा मारहाण; दुसरी पत्नी न्यायालयातप्रवीणच्या २० वर्षीय दुसऱ्या पत्नीने अंध मुलींच्या वसतिगृहात राहून बीएपर्यंत शिक्षण घेतले. एका लग्न समारंभात तिची ओळख प्रवीणसोबत झाली. दोघांनीही संस्था, आई-वडील व नातेवाइकांसमक्ष लग्न केले. ९ जानेवारी २०१७ रोजी कोर्टासमक्ष पुन्हा लग्न केले.वडाळीत भाड्याने खोली करून प्रवीण, त्याची आई, आजोबा व अंध पत्नी व सासरा असा चौघांचा संसार थाटला. मात्र, काही दिवसांतच प्रवीणने तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. भीक मागण्यासाठी मारहाण करण्यात येत होती. परिसरातील तरुणांना तो घरात आणायला लागला. तिच्या इच्छेविरुद्ध कामे करण्यास सांगू लागला. अखेर प्रवीणच्या त्रासाला कंटाळून तिने ९ नोव्हेंबर २०१७ रोजी न्यायालयात दाद मागितल्याचे तिने पोलिसांना सांगितले.