शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
7
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
8
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
9
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
10
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
11
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
12
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
13
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
14
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
15
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
16
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
17
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
18
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
19
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
20
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली

१२.५० कोटींच्या पुनर्निविदेचा पहिला टप्पा

By admin | Updated: January 25, 2015 23:06 IST

राज्य शासनाने एलबीटी तूट भरुन काढण्यासाठी महापालिकेला दिलेल्या २५ कोटींच्या अनुदानातून बडनेरा मतदारसंघात साडेबारा कोटी रुपयांची कामे मार्गी लावण्यासाठी पुनर्निविदेचा

अमरावती : राज्य शासनाने एलबीटी तूट भरुन काढण्यासाठी महापालिकेला दिलेल्या २५ कोटींच्या अनुदानातून बडनेरा मतदारसंघात साडेबारा कोटी रुपयांची कामे मार्गी लावण्यासाठी पुनर्निविदेचा पहिला टप्पा गाठला आहे. या निविदा २७ जानेवारी रोजी उघडणार असल्याची माहिती आहे.महापालिकेत दोन वर्षांपूर्वी मुलभूत सोयीसुविधांसाठी शासनाने २५ कोटींचे अनुदान दिले होते. हे अनुदान अमरावती व बडनेरा मतदार संघात समसमान म्हणजे प्रत्येकी १२.५० कोटी रुपये वाटपाचे ठरविण्यात आले. त्यानुसार माजी आ. रावसाहेब शेखावत यांनी अमरावती मतदारसंघात १२.२० कोटींची कामे महापालिका यंत्रणेच्या माध्यमातून पूर्ण केली. मात्र बडनेरा मतदार संघातील विकास कामे ही सार्वजकि बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात यावी, असा हट्ट आ. रवी राणा यांनी धरुन त्याबाबतचे पत्र शासनाकडून आणले होते. आ. रवी राणा यांनी घेतलेला निर्णय महापालिकेत संजय खोडके गटाच्या जिव्हारी लागला. आ. राणांच्या कारनाम्याला रोखण्यासाठी थेट उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली. अखेर उच्च न्यायालयाने अविनाश मार्डीकर, अजय गोंडाणे, प्रशांत वानखडे यांनी सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना १२.५० कोटी रुपयांची कामे महापालिका यंत्रणाच करणार, असा निर्णय दिला. त्यानंतर या अनुदानातील निधी वाटपावरही खल झाले. यात कसातरी मार्ग काढण्यात आला. त्यानंतर प्रशासनाने ३८ विकास कामांचा ई निविदा प्रक्रिया राबविली. मात्र कंत्राटदारांनी १३ ते २० टक्क्यापर्यंत कमी दरात कामे करण्याबाबत निविदा सादर केल्यात. त्यामुळे साडेबारा कोटी रुपयांच्या विकास कामांचा दर्जा मिळणार कसा, असा सवाल स्थायी समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला. कमी दरात कामे कसे करणार, याचा अभिप्राय कंत्राटदारांकडून मागविण्यात आला. मात्र कंत्राटदारांच्या अभिप्रायावर स्थायीच्या सदस्यांचे समाधान झाले नाही. अखेर १२.५० कोटी रुपयांच्या विकास कामांच्या पुनर्निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आयुक्त अरुण डोंगरे यांच्या आदेशान्वये कार्यकारी अभियंता अनंत पोरदार यांनी पुनर्निविदेची प्रक्रिया राबविली असून या निविदा २७ जानेवारी रोजी उघडल्या जातील, अशी माहिती आहे. महापालिकेत सन २०१२ पासून आलेल्या या अनुदानातून राजकीय भांडणामुळे विकास कामे प्रलंबित राहत असल्याचे चित्र आहे. साडेबारा कोटी रुपयांच्या विकास कामांच्या यादीतही अनेकदा बदल करण्यात आला आहे. काही कामे राजकीय मर्जीनुसार समाविष्ट करण्यात आली असून काही कामे अतिमहत्त्वाची म्हणून यात आहेत. परंतु कमी दरात ही कामे करण्याचा निर्णय कंत्राटदारांनी कसा घेतला, हा संशोधनाचा विषय आहे. अगोदरच आ. सुनील देशमुख यांनी महापालिकेत विकास कामांचा दर्जा ढासळल्याचा आरोप करीत सुरु असलेल्या विकास कामांच्या स्थळांना भेटी देऊन निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याबाबतचा पंचनामा केला आहे. हीच परिस्थिती बडनेरा मतदारसंघात करावयाच्या विकास कामात पुन्हा उद्भवू नये, यासाठी स्थायी समितीने पुनर्निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आता या निविदा उघडल्यानंतर काय स्थिती राहते, हे दोन दिवसानंतर स्पष्ट होईल. पुन्हा कमी दरात कामे करण्याचा निविदा असल्या तर स्थायी समिती अथवा प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)