नगरपालिका निवडणूक : प्रमुख राजकीय पक्षांच्या बैठकी सुरूजितेंद्र दखने अमरावतीजिल्ह्यातील नऊ नगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून नगरपरिषद असलेल्या शहराचा प्रथम नागरिक होण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षातील नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. आदर्श आचारसंहिता जाहीर होताच नेत्यांच्या सभोवती इच्छुकांचा वावर वाढला असून यात काँग्रेस, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षाच्या बैठकींचा सपाटा सुरू आहे. अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूरबाजार, मोर्शी, वरूड, शेंदूरजनाघाट, चांदूररेल्वे आणि धामणगाव रेल्वे या नगरपरिषदांची निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम १७ आॅक्टोबर रोजी जाहीर होताच इच्छुक उमेदवारांची घालमेल सुरू झाली आहे. कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, कोणत्या पक्षाचा नगरसेवक, नगराध्यक्ष होऊ शकतो, याची चाचपणी उमेदवारांनी सुरू केली आहे. काही निष्ठावान उमेदवारांनी उमेदवारी मिळणारच, या आशेतून अप्रत्यक्ष प्रचारालादेखील सुरूवात केली आहे. मात्र, प्रचाराची दिशा ठरविण्यापूर्वी नेत्यांकडून समर्थन मिळविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांची निवडणूक एकाच वेळी होत असल्याने सर्व राजकीय पक्षाचे नेते जोरदार तयारीला लागले आहेत. ऐन दिवाळीमध्ये आचारसंहिता असल्याने काही उमेदवारांवर मर्यादा येणार असल्या तरी या काळात काहीसा खर्चही कमी होणार आहे. मोर्चेबांधणी सुरूअमरावती : निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता बहुतांश पालिकांमधील सत्ताधाऱ्यांनी विकासकामांचे उद्घाटन उरकून घेतले होते. बहुतांश कामांच्या निविदा, कार्यारंभ आदेश निघाल्याने कामांची सुरुवात होऊ शकते. काही पालिकांमध्ये रखडलेला विकास आता शेवटच्या टप्प्यात असल्याचे भासविले जाऊ शकते. आचारसंहिता जाहीर झाल्यास नवीन विकासकामांना मंजुरी देता येणार नाही, हे लक्षात घेऊन पालिकांमध्ये कामांची तयारी करण्यात आली होती. त्यानुसार निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आल्या होत्या. काही ठिकाणी मात्र विकासकामांना ब्रेक लागला आहे. (प्रतिनिधी)
प्रथम नागरिक होण्यासाठी आता सव्वा महिना रस्सीखेच
By admin | Updated: October 19, 2016 00:08 IST