शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईच्या ३,०७० जागांसाठी पहिली सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 22:42 IST

शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रियेंतर्गत आॅनलाईन अर्जाची दुसऱ्या टप्प्यातील सोडत १२ मार्चला एकूण ३ हजार ०७० जागासाठी सोडत काढण्यात आली आहे.

ठळक मुद्देसात हजारांवर अर्ज : २४ मार्चपर्यंत प्रवेश करावा निश्चित

 आॅनलाईन लोकमतअमरावती : शिक्षण हक्क प्रवेश प्रक्रियेंतर्गत आॅनलाईन अर्जाची दुसऱ्या टप्प्यातील सोडत १२ मार्चला एकूण ३ हजार ०७० जागासाठी सोडत काढण्यात आली आहे. यात ७ हजार ०८१ अर्जांची सोडत काढण्यात आली आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आरटीई प्रवेशासाठीची पहिली सोडत सोमवारी झेडपीचे शिक्षण व बांधकाम सभापती जयंत देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी आर.डी. तुरणकर, उपशिक्षणाधिकारी जयश्री राऊत, विस्तार अधिकारी किशोर पुरी, प्रिती गावंडे आदींच्या उपस्थितीत पार पडली. या सोडतीत नेमके किती प्रवेश निश्चित होतील, हे मात्र १३ मार्च रोजीच स्पष्ट होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई)साठी जिल्ह्यात ३ हजार ७० जागांसाठी तब्बल ११ हजार ०९ अर्ज आॅनलाईन प्राप्त झाले होते. त्यापैकी ३ हजार ९२८ पालकांनकडून निश्चित केले नाही. त्यामुळे ७ हजार ०८१ अर्जच आरटीईसाठी निश्चित करण्यात आले. यासर्व अर्जासाठी ही सोडत काढली आहे. शिक्षण विभागाकडे आरटीई प्रवेशासाठी एकूण २३३ शाळांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २७ शाळा नर्सरीच्या २१० जागासाठी आहेत. उर्वरित २८६० जागा इयत्ता पहिलीसाठी आहेत. भातकुली पंचायत समितीच्या सभागृहात पार पडलेल्या आरटीई सोडतीची प्रक्रिया तीन प्लेटांमध्ये चिठ्ठया टाकूण काढण्यात आली. यावेळी केजीवनचा विद्यार्थी प्रणव आनंद भैसारे व अथर्व दीपक गावंडे या चिमुकल्याच्या हाताने चिठ्ठ्या काढूृन सोडतीची प्रक्रिया शिक्षण विभागाने पूर्ण केली आहे.सर्व प्रक्रिया आॅनलाईन असून ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत अशा सर्व पालकांना सोडतीची माहिती पालकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना १४ ते २४ मार्चपर्यंत प्रवेशाची संधी मिळालेल्या शाळेत जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रवेशासाठी एकापेक्षा अधिक शाळांमध्ये जागा मिळालेल्या पाल्यांच्या पालकांनी पसंतीच्या कोणत्याही एकाच शाळेत प्रवेश घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. यावेळी पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.