शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमबहुल भागातील विदर्भातला पहिला घरकुल प्रकल्प अमरावतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 21:38 IST

आकोली वळण ररस्त्याने बेघर झालेल्या मुस्लिम कुटुंबांना आता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. किंबहुना मुस्लिमबहुल वस्तीमधील विदर्भातील पहिला प्रकल्प अमरावती शहरात साकारला जात आहे.

- गजानन मोहोड

अमरावती : आकोली वळण ररस्त्याने बेघर झालेल्या मुस्लिम कुटुंबांना आता पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. किंबहुना मुस्लिमबहुल वस्तीमधील विदर्भातील पहिला प्रकल्प अमरावती शहरात साकारला जात आहे. यामध्ये आर्थिकदृट्या दुर्बल गटातील लाभार्थींना वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान या घटकांतर्गत हा लाभ देण्यात आलेला आहे.शहराच्या पश्चिमेकडील लालखडी हा प्रामुख्याने मुस्लिमबहुल परिसर आहे. अकोली वळणरस्त्याच्या कामात या भागातील १२० कुटुंबे बाधित होणार होती. तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांनी प्रत्येकी ५०० चौरस मीटर जागा देऊन या कुटुंबांचे पुनर्वसन दोन एकर जागेमध्ये केले. त्याला इमामनगर असे नाव देण्यात आले. या वस्तीमध्ये राहणारे नागरिक प्रामुख्याने श्रमजिवी वर्गातील मोलमजुरी करणारे आहेत. त्यामुळे पक्की घरे बांधणे त्यांना शक्य नव्हते. आतापर्यतच्या घरकुल योजनेतील अनेक जाचक अटींमुळे हे नागरिक घरकुलांपासून वंचित होते. मात्र, ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याने आता या ठिकाणी आता नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेतंर्गत घरकुल बांधण्याचा मार्ग प्रशस्त झालेला आहे. विदर्भातील मुस्लिीमबहुल भागातील हा पहिलाच घरकुल प्रकल्प ठरला आहे.प्रकल्पामध्ये ६० नागरिकांनी अर्ज केलेत. यापैकी २७ नागरिकांनी आपल्या जागेचे रीतसर शुल्क भरून परवानगी घेतल्याने या नागरिकांना आता घरकुलाचा लाभ मिळत आहे. या नागरिकांना त्यांच्या बांधकामानुसार घरकुलाचा हप्ता देण्यात आलेला आहे. काही नागरिक परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. या नागरिकांना घरकुल स्वत: बांधायचे आहे. यामध्ये जोथ्यापर्यंत बांधकाम झाल्यावर  एक लाख, छतापर्यंत आल्यानंतर एक लाख व घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ५० हजार मिळतील, असे उपअभियंता सुनील देशमुख म्हणाले.  

महापालिकेत योजनेची सद्यस्थिती योजनेच्या ४७३२ लाभार्थींना केंद्राच्या मान्यता व सनियंत्रण समितीने डीपीआरला मान्यता दिली. आतापर्यंत यासाठी ५५.८६ कोटी या घटकांतर्गत प्राप्त झाले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील वार्षिक तीन लाखांपर्यंत उत्पन्न असणाºया लाभार्थ्यांना ३० चौ.मी. घरकुलाचे बांधकाम करावयाचे आहे.  

आर्थिक दुर्बल गटातील नागरिकांसाठी घरकुल उभारले जात आहे. विदर्भातील मुस्लिमबहुल भागातील हा पहिलाच प्रकल्प अमरावतीत निर्माणाधीन आहे.- सुनील देशमुख, उपअभियंता, पंतप्रधान आवास योजना