शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उत्साहात वाजली पहिली घंटा

By admin | Updated: June 28, 2017 00:12 IST

दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्या आणि मंगळवारी शाळा पुन्हा गजबजल्या. नवीन दप्तर, गणवेश, नवी कोरी पुस्तकांच्या ओढीने उत्साहात विद्यार्थी शाळेत आलेत.

शाळा गजबजल्या : रॅली, दिंडी, मिष्ठान्न वाटपासह नवागतांचा प्रवेशोत्सवलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्या संपल्या आणि मंगळवारी शाळा पुन्हा गजबजल्या. नवीन दप्तर, गणवेश, नवी कोरी पुस्तकांच्या ओढीने उत्साहात विद्यार्थी शाळेत आलेत. शासनाद्वारे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा केला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या उत्साहाला अधिक आनंदाची किनार लाभली आहे. या आनंदातच मंगळवारी शाळेची पहिली घंटा वाजली. काही अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठपुस्तक ांचे वाटपही करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी सकाळपासून पालकांची साथ होती.शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये उत्साहवर्धक वातावरण होते. पालकांसह शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व स्थानिक लोकप्रतिनिधींनी गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चॉकलेट वितरित करण्यात आलेत. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे मोफत वितरण अमरावती : सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासह पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. सकाळी ८ वाजता काही ठिकाणी दिंड्या, पालखी मिरवणूक, दुचाकी रॅलीदेखील काढण्यात आली. बचत गट, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालकांच्या उपस्थितीत जनजागृती फेऱ्यादेखील काढण्यात आल्यात. शहरात प्रभागातील नगरसेवक, तर ग्रामीण भागात ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीसुद्धा नवागतांचे स्वागत केले. शासकीय व खासगी शाळेत इयत्ता पहिली ते सातवीच्या मुलींना मोफत पाठपुस्तकांचे वाटप करण्यात आले.मंगलमय वातावरणपाना-फुलांनी सजविलेल्या शाळा, जागोजागी रेखाटलेल्या रांगोळ्या, अशा प्रसन्न व मंगलमय वातावरणात मंगळवारी नव्या शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. जिल्हा परिषद, महापालिका व खासगी शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पालकांचा उत्साह देखील पाहण्यासारखा होता. सकाळपासून पाल्यांना शाळेत पोहोचविण्याची लगबग दिसून आली. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात शाळेचा पहिला दिवस आनंददायी ठरल्याचे चित्र शाळांमध्ये होते.लोकप्रतिनिधींचा उत्साहवर्धक सहभागजिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची पहिली घंटा मंगळवार २७ जून रोजी वाजली. शिक्षण विभागाने प्रवेशोत्सवाची जय्यत तयारी केली होती. विद्यार्थी व त्यांच्यापालकांचे स्वागत करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, शिक्षण सभापती जयंत देशमुख, आरोग्य सभापती बळवंत वानखडे, डेप्युटी सीईओ प्रकाश तट्टे,शिक्षणाधिकारी एस.एम पानझाडे, सी.आर. राठोड आदींसह सर्व खातेप्रमुख आवर्जुन उपस्थित होते. याशिवाय अंगणवाडी केंद्रातही चिमुकल्यांच्या प्रवेशानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.