शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परतवाड्याच्या मिल स्टॉपवर हवेत फायरिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:01 IST

चौकात फटाक्यांचा आवाज येत असल्याने अनेकांचे कान टवकारले. परिसरातील मंगल कार्यालयात फिजिकल डिस्टन्स ठेवत लग्न असेल; त्यात फटाके फोडत असल्याचा भास झाला. परंतु, प्रत्यक्षात वेगळेच होते.दुचाकीवर आलेला इसम प्लास्टिकच्या खेळण्याच्या बंदुकीप्रमाणे असलेल्या यंत्रात कार्पेट आणि पाणी टाकून हलवित होता. गॅस लायटर लावले की, हवेच्या दिशेने खाड्कन आवाज निघत होता.

ठळक मुद्दे‘तो’ बंदुका विकून निघून गेला : आवाजाने ‘ते’ सैरावैरा पळत सुटले

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : मंगळवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास एक इसम दुचाकीने आला. त्याने बाजूला बांधलेली पिशवी उघडली. त्यातून बंदूक काढली. त्यात आवश्यक ती सामग्री टाकली आणि हवेत फायरिंग केली. झालेल्या आवाजाने परिसर दणाणून गेला. घरावर बसलेले ‘ते’ सैरावैरा पळत सुटले. या प्रकाराने सर्व नागरिकांचे लक्ष त्याने वेधून घेतले.त्याचे झाले असे की, परतवाडा-अमरावती महामार्गावरील मिल स्टॉपला लागूनच असलेल्या देवमाळी परिसरात बहुतांशी नोकरदार वर्ग. त्यामुळे रस्त्यावर वर्दळ होती. अशात दुचाकीवर थेट बंदूक विकण्यासाठी आलेल्या त्या इसमाने केलेल्या फायरिंगच्या आवाजामुळे सर्वांचे लक्ष आकर्षित केले. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अनेकांनी त्याच्याकडून त्या बंदुका विकत घेतल्या आणि आत्मसंरक्षणासाठी सुरक्षिततेचा भाव चेहऱ्यावर आणत घरी परतले.काय आहे नेमका प्रकार?चौकात फटाक्यांचा आवाज येत असल्याने अनेकांचे कान टवकारले. परिसरातील मंगल कार्यालयात फिजिकल डिस्टन्स ठेवत लग्न असेल; त्यात फटाके फोडत असल्याचा भास झाला. परंतु, प्रत्यक्षात वेगळेच होते.दुचाकीवर आलेला इसम प्लास्टिकच्या खेळण्याच्या बंदुकीप्रमाणे असलेल्या यंत्रात कार्पेट आणि पाणी टाकून हलवित होता. गॅस लायटर लावले की, हवेच्या दिशेने खाड्कन आवाज निघत होता. या आवाजाने परिसरात हैदोस घालणारे माकड सैरावैरा पळत सुटले. भेटली एकदाची संरक्षणात्मक वस्तू म्हणून प्रत्येकाने ती खरेदी केली.

टॅग्स :Monkeyमाकड