शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर बाजार समितीकडून हाडपकापूर्वीच फोडले फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:12 IST

परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हाडपकापूर्वीच फोडो गेलेले फटाके सहकार क्षेत्रात चांगलेच चर्चेत आले आहेत. बाजार समितीकडून ...

परतवाडा : अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हाडपकापूर्वीच फोडो गेलेले फटाके सहकार क्षेत्रात चांगलेच चर्चेत आले आहेत. बाजार समितीकडून संत गाडगेबाबा शेतकरी व्यापारी संकुलाचा १८ सप्टेंबर रोजी उद्घाटन सोहळा पार पडला.

या सोहळ्याप्रसंगी समितीचे सचिव पवन सार्वे उपस्थितांना व्यासपीठावर दिसून आले नाहीत. यात माजी सचिव अर्डक यांचा राबता व्यासपीठावर बघायला मिळाला. सचिव पवन सार्वे यांची ही अनुपस्थिती लक्षवेधक ठरली. कार्यक्रमादरम्यान ते सर्वांत मागे कोपऱ्यात उभे होते. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हा उद्घाटन सोहळा, संचालकांची मुदत संपल्यानंतर घाईगडबडीत घेण्यामागचे कारण लगेच सुरू होणारा हाडपक असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट केले गेले. म्हणे, हाडपकात शुभकार्य नको. या हाडपकाच्या दहशतीत लागलीच निमंत्रणपत्रिका छापली गेली. पण घाईत अनेकांपर्यंत निमंत्रणपत्रिका पोहोचूच शकल्या नाहीत. कार्यक्रमाच्या अध्यक्ष आमदार सुलभा खोडके याही कार्यक्रमाला येऊ शकल्या नाहीत.

कार्यक्रमस्थळी फटाक्यांची जय्यत तयारी केल्या गेली. पाहुणे आले की, फटाके फोडायचे; पण हे फटाके पाहुणे येण्यापूर्वीच फोडले गेलेत. बाजार समितीकडून हाडपकापूर्वी फोडले गेलेले फटाके चर्चेत आलेत. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी याप्रसंगी आपल्या शाब्दिक आतषबाजीत खरेदी-विक्री आणि ईडीचा उल्लेख केला. सहकार क्षेत्राचा समाचार घेतला. जिल्हा मध्यवर्ती बँकेपर्यंतही ते पोहोचलेत.

बॉक्स

संचालकांची मुदत संपली

शासन आदेशानुसार अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २ सप्टेंबरला संपली. त्यानंतर हा उद्घाटन सोहळा हाडपकाच्या भीतीपोटी बाजार समितीकडून आयोजित केला गेला. मात्र, तो सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय बनला.

कोट

गणेशमूर्ती विसर्जनानंतर लागलीच हाडपक सुरू होत असल्याने घाईगडबडीत अगदी वेळेवर व्यापारी संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. यात अनेकांपर्यंत कार्यक्रमाच्या पत्रिका पोहोचू शकल्या नाहीत.

- अजय पाटील टवलारकर, सभापती, बाजार समिती, अचलपूर

कोट

लागणाऱ्या हाडपकामुळे व्यापारी संकुलाच्या उद्घाटनाची घाई केली गेली. यातच राज्यमंत्री बच्चू कडू यांची १८ सप्टेंबर ही तारीख मिळू शकली.

- सतीश व्यास, संचालक, व्यापारी व अडते, बाजार समिती, अचलपूर

दिनांक 20/9/21 फोटो दिनांक22/9/21 दिनांक24.09.21