शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भीषण आगीत चार दुकाने खाक

By admin | Updated: February 12, 2017 00:13 IST

स्थानिक नवी वस्तीतील जयहिंद चौक परिसरात शुक्रवारी मध्यरात्री चार दुकानांना भीषण आग लागली.

बडनेरा येथील घटना : लाखोंचे नुकसान, अग्निशमन विभाग तत्परबडनेरा : स्थानिक नवी वस्तीतील जयहिंद चौक परिसरात शुक्रवारी मध्यरात्री चार दुकानांना भीषण आग लागली. यात चारी दुकानांतील माल जळून खाक झाला. त्यामुळे व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन विभागाने वेळेवर घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. बडनेऱ्यातील जहहिंद चौकस्थित रवी अ‍ॅन्ड डेली निड्स, रवी जनरल अ‍ॅन्ड मोबाईल, फॅशन टेलर्स व न्यू लाईफ टेलर्स ही व्यापारी प्रतिष्ठाने शुक्रवारी मध्यरात्री आगीच्या विळख्यात सापडली. मोबिनपुऱ्यातील रहिवासी मोहनिस खान यांच्या न्यू लाईफ टेलर्स या व्यापारी प्रतिष्ठातून धूर बाहेर येत होता. मात्र, काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण करून चारही दुकानांना कवेत घेतले. ही बाब बडनेरा रेल्वे स्थानकावर तैनात असणाऱ्या एका आरपीएफ जवानाच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ याची माहिती अग्निशमन व पोलीस विभागाला दिली. या माहितीच्या आधारे अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळ गाठले व आगीवर पाण्याचा मारा करण्यास सुरुवात केली. दरम्यान काही नागरिकांनी दुकानांची दारे उघडून आतील साहित्य वाचविण्याच्या उद्देशाने बाहेर काढण्यास सुरुवात केली. यामध्ये काही प्रमाणात रवि मोबाईल, डेली निड्स व फॅशन टेलर्स या प्रतिष्ठांतून साहित्य बाहेर काढण्यात नागरिकांना यश आले. त्यामुळे त्यांचे काही प्रमाणात नुकसान टाळणे शक्य झाले. रात्री २ वाजताच्या सुमारास लागलेली ही आग पहाटे ५ वाजता अग्निशमन विभागाच्या अथक प्रयत्नाने नियंत्रणात आणणे शक्य झाले. मात्र, या आगीत व्यापारी प्रतिष्ठानातील लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला. त्याचप्रमाणे सिंधी कॅम्प येथील रहिवासी अशोकुमार रोचलानी यांच्या साई आॅनलाईन लॉटरीच्या दुकानातील तीन संगणक जळून खाक झाले, तर महेश धनवानी यांच्या रवि मोबाईल आणि चंदुलाल धनवानी यांच्या डेली निड्स या दुकानातील मुद्देमाल जळून खाक झाला. ही घटना शॉर्ट सर्किटने लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या घटनेमुळे बडनेऱ्यात मोठी गर्दी उसळली होती. (शहर प्रतिनिधी)मोठा अनर्थ टळलाबडनेरा शहरात तीन महिन्यांपूर्वी जयहिंद चौकापासून काही अंतरावर असणाऱ्या शशिकांत कसलचंद यांच्या किराणा दुकानाला आग लागली होती. त्यापूर्वीही अनेक आगीच्या घटना बडनेरात घडल्या आहेत. त्यावेळी बडनेरातील महापालिका कार्यालयात अग्निशमन दलाच्या वाहनांची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली होती. त्यामुळे स्थायी स्वरुपात अग्निशमनची वाहने ठेवण्यात आली. शुक्रवारी मध्यरात्री आगीची माहिती मिळताच तत्काळ मदत मिळाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा या चार दुकानांच्या शेजारीच असलेली १० ते १२ दुकाने आगीच्या विळख्यात सापडली असती.