शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
2
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
3
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
4
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
5
Two Wheeler Toll: आता दुचाकींनाही टोल; १५ ऑगस्टपासून 'या' मार्गांवरून जाण्यासाठी मोजावे लागणार पैसे
6
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
7
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
8
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
9
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 
10
'नमस्कार फ्रॉम स्पेस...', अंतराळातून शुभांशू शुक्लांचा नवीन Video; काय म्हणाले पाहा...
11
'या' तरुणीने रील बनवून कमावले ४१ कोटी! रोज कमावते अडीच लाख रुपये! कोण आहे 'द रिबेल किड'?
12
‘यूं ही चला चल…’ गाणे ऐकले अन्...; हवाई दलाचे वैमानिक ते अंतराळवीर अशी भरारी, असा आहे शुभांशू शुक्ला यांचा प्रवास
13
'शांत हो श्रीगुरुदत्ता' हे विनवणीपर कवन टेंबे स्वामींना का लिहिले? त्याक्षणी नेमके घडले तरी काय?
14
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
15
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
16
मुंबईत ३० व्या मजल्यावरून उडी घेत अल्पवयीन मुलीची आत्महत्या; कुटुंबीयांकडून घातपाताचा संशय
17
FASTag वापरणाऱ्यांसाठी खूशखबर! आता फक्त टोल नाही, तर पार्किंग-चार्जिंगसह 'या' कामांसाठीही वापरता येणार?
18
मित्रांसोबत इकडं जा... तिकडं जा खेळ रंगला अन् सराव कमी पडला! पृथ्वी शॉला चूक कळली, आता...
19
Video: धक्कादायक! रील बनवण्यासाठी महिलेने चक्क रेल्वे रुळांवरून चालवली कार, अखेरीस...  
20
Viral Video: धापा टाकत रुग्णालयात पोहोचला, डॉक्टरांनी विचारताच उघडली बॅग, पाहून अनेकांची बोलती बंद!

आपत्कालीन स्थितीसाठी अग्निशमन सज्ज

By admin | Updated: June 12, 2014 23:40 IST

महापालिकेद्वारे पावसाळ्यातील आपत्कालीन व्यवस्थेकरिता उपकरणे हाताळणीच्या कार्यशाळेचे आयोजन वॉलकट कम्पाऊट येथील अग्निशमन विभागात करण्यात आले. यावेळी उपकरणाबद्दल माहिती

अमरावती : महापालिकेद्वारे पावसाळ्यातील आपत्कालीन व्यवस्थेकरिता उपकरणे हाताळणीच्या कार्यशाळेचे आयोजन वॉलकट कम्पाऊट येथील अग्निशमन विभागात करण्यात आले. यावेळी उपकरणाबद्दल माहिती व त्यांच्या उपयोगासंबंधित प्रशिक्षण कर्मचाऱ्यांंना देण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन महापालिका उपायुक्त रामदास सिध्दभट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. महापालिकेने आपत्कालीन स्थिती सांभाळण्याकरिता हायड्रोलिक जॅक, चेन सॉ, क्राँक्रीट कटर, रेस्क्यु सॉ, रेस्क्यु टेंडर, व्हॅन, फायर सूट, केमिकल सूट, फायर सेफ्टी साहित्य याकरिता त्वरित विकत घेतले होते. या कार्यशाळेत अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आपत्कालीन स्थितीत येणाऱ्या अडचणीविषयक माहिती देण्यात आली. तसेच उपकरणांचा उपयोग कसा करावा याबद्दल सूचना देण्यात आल्या. आपत्कालीन स्थितीत काम करताना कोणत्या बाबीला प्राध्यान द्यावे ते कसे करावे याबद्दल वरिष्ठांशी संपर्क करुन समयसूचकता ठेवणे अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी एम.एच. रहेमान, अधीक्षक होमगार्ड व राजेन्द्र बनसोड यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. या कार्यशाळेला उपआयुक्त रमेश मवासी, सहायक आयुक्त राहुल ओगले, नरेन्द्र वानखडे, योगेश पिठे, अनंत पोतदार, आरोग्य अधिकारी देवेन्द्र गुल्हाने, अजय जाधव, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, अग्निशमन विभागाचे अधीक्षक भरतसिंह चव्हाण, दिलीप पडघन, पी. एम. देशमुख, भाष्कर तिरपुडे, सुहास चव्हाण, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर, स्वास्थ अधीक्षक एम. ए. खान, सचिन बोन्द्रे, संदिप देशमुख आदी उपस्थीत होते.