शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

पाच ठिकाणी अग्नितांडव

By admin | Updated: April 21, 2017 00:17 IST

नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आज दुपारी पाच ठिकाणी आगीने तांडव घातले. या आगीत दुपारी अडीच वाजताचे सुमारास धर्मापूर येथे

नांदगाव तालुका हादरला : प्रशासनाची आपातकालीन बैठक नांदगाव खंडेश्वर : नांदगाव खंडेश्वर तालुक्यात आज दुपारी पाच ठिकाणी आगीने तांडव घातले. या आगीत दुपारी अडीच वाजताचे सुमारास धर्मापूर येथे आग लागून १० घरांची राखरांगोळी झाली. तसेच अडगाव बु. येथे आज दुपारी १ वाजता आग लागून २ घरे जळाली. तसेच वाघोडा या गावातील बसस्टँड जवळील गावाला लागूनच असलेल्या गुराच्या गोठ्याला आग लागून कुटारांची गंजी आगीत जळाली. तसेच पिंप्री कलगा या गावाजवळ नागपूर-औरंगाबाद हायवे लगतच्या असलेल्या आजूबाजूच्या जागेवरील गवत व झाडे झुडूपे पेटल्याने काही काळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच दहिगाव येथील कामधेनू संस्थेची कुटाराची गंजी आगीत राख झाली.धर्मापूर येथे गुरुवारी दुपारी अडीच वाजताचे सुमारास गावाच्या पश्चिमेकडील घराला आग लागून आगीत दादाराव गोविंदराव शिंदे, सुभाष राजाराम शिंदे, संतोष शिंदे, शिवराम शिंदे, मारोती शिंदे, सावळा शिंदे, शंकर शिंदे, अंकूश शिंदे व लहु शिंदे यांची घरे आगीत भस्मसात झाली. यामुळे घरातील तूर, सोयाबीन, चना, गहू व घरातील जीवनावश्यक वस्तूंची आगीत जळून राखरांगोळी झाली. तसेच प्रकाश पाडर यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लागून कुटार जळाले. लागूनच असलेल्या कोल्हापूर देवीचे मंदिरही आगीत होरपळून निघाले. धर्मापूर व ढवळसर येथील गावकऱ्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून आग विझविली. यावेळी हवेचा झोत गावाच्या दिशेनेच सुरू होता. पण आग आटोक्यात आल्याने गावातील इतर घरे बाल-बाल बचावली. अडगाव बु। येथे दुपारी १ वाजता आग लागून अमर जोगदंडे व गीता वसंतराव लहाबरे यांची घरे जळून खाक झाली. घटनास्थळी तहसीलदार बी.व्ही. वाहुरवाघ, तलाठी, अग्निशमन दलाची गाडी दाखल झाली होती. शुक्रवारी तहसील कार्यालयात प्रशासनाने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. (तालुका, शहर प्रतिनिधी)