शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

जुळ्या शहरातील दुकानांचे होणार 'फायर आॅडिट'

By admin | Updated: March 21, 2017 00:16 IST

येथील खासगी जिनिंगला लागलेल्या आगीचे कारण प्रथमदर्शी 'शॉर्टसर्किट' सांगितले जात असताना ...

परवाना रद्द होणार : जिनिंगची आग निष्काळजीपणातून ? दुकानदारांची बेबंदशाही चव्हाट्यावरपरतवाडा : येथील खासगी जिनिंगला लागलेल्या आगीचे कारण प्रथमदर्शी 'शॉर्टसर्किट' सांगितले जात असताना घटनास्थळी प्रत्यक्षात अधिकाऱ्यांना अनियमितता आढळून आल्याची माहिती आहे. त्याच धर्तीवर जुळ्या शहरातील व्यावसायिकांचे 'फायर आॅडिट' करण्याचे आदेश सोमवारी तहसीलदार मनोज लोणारकर यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्याने दुकानदारांची बेबंदशाही चव्हाट्यावर आली आहे. शहरातील एखाद्या प्रतिष्ठानाला आग लागल्यास विझविण्यासाठी अग्निशमन दलास तारेवरची कसरत करून तेथे पोहोचावे लागते. तोपर्यंत बराच अवधी निघून जात असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येत असल्याचे चित्र जुळ्या शहरातील आहे. एखाद्या प्रतिष्ठानाला आग लागल्यानंतर इतर दुकानदारांनी त्यापासून धडा न घेता तेसुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनात आल्याने आगीच्या घटना रोखण्यासाठी जुळ्या शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांचे फायर आॅडिट करण्याचे आदेश तहसीलदारांनी नगरपालिका मुख्याधिकारी प्रदीप जगताप यांना दिले. जिनिंगच्या आगीत अनियमितता रविवारी दुपारी ३.३० वाजता नजीकच्या जवर्डी येथील आर.आर. अग्रवाल यांच्या जिनिंगला लागलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे. तिन्ही कापसाच्या गंज्या विद्युत तारांखाली ठेवण्यात आल्या जोत्या. विद्युत तार झाडांच्या फांद्यांमध्ये अडकले होते. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असले तरी ते प्रत्यक्षात बंद असल्याचे प्रशासनाला सांगण्यात आले. जिवंत विद्युत तारा रविवारी हवेच्या वेगाने एकमेकांना घर्षण करीत त्यांचीच ठिणगी कापसाच्या गंजीवर पडली किंवा आग कशाने लागली, हे सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याने आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. आवश्यक त्या बाबी पायदळी तुडविल्याचे चित्र प्रशासनाला घटनास्थळी दिसून आले. प्रतिष्ठानांची तपासणी जुळ्या शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये आग लागण्याचे कारण कुठले यासंदर्भात सर्वप्रथम त्यांनी सूचनांचे पालन केले किंवा नाही, व्यापारी प्रतिष्ठाने सुरू करताना आवश्यक त्या आगी लागण्याच्या प्रमुख बाबी दुर्लक्षित केल्या का, याची प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेश तहसीलदार मनोज लोणारकर यांनी दिले आहे.परवाना रद्द करून कारवाईशासकीय नियमानुसार 'फायर आॅडिट' करताना आढळलेल्या चुकांवर कटाक्षाने कारवाई करण्यात येणार असून, ज्या दुकानदाराने नियमांचे उल्लंघन केले अशांचे व्यापारी परवाने रद्द करण्यात येणार आहे. परिणामी संभाव्य सुरक्षेच्या दृष्टीने सदर कारवाईचे आदेश दिले आहेत.अशा घटना बहुधा घडल्यातपरतवाडा शहरातील जिनिंग प्रेसिंगला अनेकदा आगी लागण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. इंशुरन्स काढून अशा आगी लावण्यात येत असल्याच्या चर्चेला त्या आगीच्या वेळी पेव फुटले होते. जवर्डीनजीकच्या खासगी औद्योगिकमधील आर.आर. जिनिंगची आग कशाने लागली, यााची तपासणी अचलपूर पोलीस विभाग करीत आहे. घटनास्थळी आढळलेल्या उणिवांवर प्रशासन कुठली कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जुळ्या शहरातील व्यापारी प्रतिष्ठानांचे 'फायर आॅडिट' करण्याचे आदेश नगरपालिकेला दिले आहे. तर जिनिंगच्या आगीची चौकशी करण्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे. - मनोज लोणारकर, तहसीलदार, अचलपूर