शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

आखतवाडा येथे आग; पाच झोपड्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:13 IST

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती तिवसा : तालुक्यातील आखतवाडा येथे मुस्लिम वस्तीत शनिवारी दुपारी १२.३० वाजता आग लागून पाच ...

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती

तिवसा : तालुक्यातील आखतवाडा येथे मुस्लिम वस्तीत शनिवारी दुपारी १२.३० वाजता आग लागून पाच झोपड्या जळून खाक झाल्या. तिवसा अग्निशमन दलाच्या वाहनाने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरातील सर्व साहित्य जळून गेल्याने पाचही कुटुंब उघड्यावर आले आहेत.

शेख जहीर शेख कादीर, अयुब शहा मनू शहा, इनायत खा नयुउल्ला खा, सय्यद नाझीम सय्यद नशीब, शेख इरफान शेख अब्दुल या पाच जणांच्या घराला आग लागल्याने त्यांचे घर पूर्णपणे जळून खाक झाले आहेत. हे सर्व कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्या घरावरून गेलेल्या वीज तारांवरून शॉर्ट सर्किट झाल्याने त्याची ठिणगी एका घरावर पडली. पाहता पाहता आगीने पाच घरे कवेत घेतली. यात जीवनावश्यक वस्तूंसह कपडे जळून खाक झाले. माहिती मिळताच तिवसा नगरपंचायतचे अग्निशमन वाहनदेखील घटनास्थळी दाखल झाले. नगरपंचायतीचे कर्मचारी सूरज शापामोहन, निखिल वानखडे, राहुल वानखडे, गौरव सोनोने यांनी अग्निशमनाचे प्रयत्न केले.