शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हा दाखल, राहुलची सारवासारव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 23:14 IST

सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या नामवंत महिलेविषयी बदनामीकारक कमेंट टाकणाºया राहुल भोईर नावाच्या फेसबुकधारकाने माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायबर पोलिसांनी त्या फेसबुक धारकाविरुद्ध गुन्हा नोंदविल्याने आता माफी मागून उपयोग होणार तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देफेसबुकच्या माहितीनंतर होईल अटक : सायबर पोलिसांचे फेसबुक कार्पोरेशनला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या नामवंत महिलेविषयी बदनामीकारक कमेंट टाकणाºया राहुल भोईर नावाच्या फेसबुकधारकाने माफी मागून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायबर पोलिसांनी त्या फेसबुक धारकाविरुद्ध गुन्हा नोंदविल्याने आता माफी मागून उपयोग होणार तरी कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.शहरातील नामवंत सामाजिक महिला कार्यकर्तीने लक्ष्मीपूजनाचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या छायाचित्रावर अनेकांनी चांगल्या पद्धतीने कमेंट केल्या. मात्र, सरकारनामा फेसबुक पेजवर अपलोड असलेल्या छायाचित्राखाली राहुल भोईर नावाच्या फेसबुकधारकाने अश्लील कमेंट केल्याचे निदर्शनास आले. ही बाब महिलांसाठी लज्जास्पद असून, बदनामीकारक ठरली. या गंभीर प्रकाराची तक्रार महिलेने मंगळवारी सायबर पोलीस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी  https://www. facebook.com/shivanshbhoir या फेसबुकच्या खातेधारकांविरुद्ध भादंविच्या कलम ३५४(अ), ५०० व ६७ आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी तपासकार्य सुरू असून, आरोपी फेसबुकधारकाची माहिती फेसबुक कार्पोरेशनला मागिवली आहे. ती माहिती मिळाल्यानंतर संबंधित फेसबुकधारकाविरुद्ध अटकेची कारवाई केली जाणार आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती वाºयासारखी शहरात पसरली असून, ही माहिती संब्ंधित राहुल भोईर नामक फेसबुकधारकापर्यंत पोहोचली असावी. बुधवारी सायबर पोलिसांनी संबंधित वेबपोर्टलवर नजर टाकली असता, आरोपी फेसबुकधारकाने चूक झाल्याची कबुली देऊन माफी मागितल्याचा संदेश पाठविला आहे. राहुल भोईर हा एका राजकीय पक्षाशी जुळलेला असून, अशा व्यक्तीकडून अशाप्रकारचे कमेंट करण्यात आल्याची माहिती निंदनीय असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.