शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

बनावट स्वाक्षरीप्रकरणी ‘एफआयआर’

By admin | Updated: January 24, 2017 00:15 IST

प्रभागातील साफसफाईच्या देयकांवर आढळून आलेल्या स्वास्थ्य अधीक्षकांच्या बनावट स्वाक्षरीप्रकरणी ‘एफआयआर’ नोंदविला जाणार आहे.

साफसफाई देयकांमधील अनियमितता : आयुक्तांनीही जाणून घेतले प्रकरणअमरावती : प्रभागातील साफसफाईच्या देयकांवर आढळून आलेल्या स्वास्थ्य अधीक्षकांच्या बनावट स्वाक्षरीप्रकरणी ‘एफआयआर’ नोंदविला जाणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी या कारवाईला सोमवारी दुजोरा दिला. बडनेरा शहरातील दोन प्रभागातील साफसफाईच्या देयकांवर स्वास्थ्य अधीक्षक अरूण तिजारे यांची बनावट स्वाक्षरी आढळून आली होती. तेच याप्रकरणी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार नोंदवतील. तसे आदेश त्यांच्या नावे काढण्यात येणार आहेत. याकारवाईमुळे ‘ती’बनावट स्वाक्षरी कुणाची हे पोलीस तपासात निष्पन्न होईल. ‘बनावट स्वाक्षरीने १० लाखांचे बिल’ या शीर्षकाने साफसफाई देयकांमधील ही अनियमितता ‘लोकमत’ने रविवारी उघड केली. त्याअनुषंगाने सोमवारी आयुक्त हेमंत पवार यांनी अतिरिक्त आयुक्तांकडून माहिती घेतली तथा चौकशीच्या अनुषंगाने काही सूचना केल्यात. त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी त्या देयकावरील बनावट स्वाक्षरी कुणाची, हे शोधण्यासाठी थेट फौजदारी तक्रार नोंदविण्याचा पवित्रा घेतला. यामुळे संबंधित घटकांचे धाबे दणाणले आहेत.बडनेऱ्यातील दोन प्रभागातील प्रकारअमरावती : याप्रकरणी पूर्वीच वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांसह सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी व स्वास्थ्य अधीक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मात्र बनावट स्वाक्षरी कुणाची, हे मात्र अनुत्तरित होते. एफआयआर नोंदविल्यानंतर ते उघड होईल. सुमारे १० लाख रुपयांची ही आर्थिक अनियमितता आहे. महापालिकेतील ४३ प्रभागांची दैनंदिन साफसफाई करण्यासाठी प्रभागनिहाय कंत्राटदार नेमण्यात आलेत. कंत्राटदारांकडून पुरविण्यात येणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी आणि संबंधित बाबींची खातरजमा केल्यानंतर प्रभागाच्या स्वास्थ्य निरीक्षकांकडून देयकांबाबत अहवाल सादर केला जातो. विविध स्तरावर त्या देयकाची तपासणी केल्यानंतर देयके अदा केली जातात.बडनेऱ्यातील प्रभाग क्रमांक ४१ बारीपुरा येथील बहिरमबाबा संस्था आणि प्रभाग क्रमांक ४२ सोमवार बाजार येथील मरिमाता बचत गट बडनेरा या संस्थेची माहे जुलै आणि आॅगस्ट या दोन महिन्यांचे चार देयके अतिरिक्त आयुक्तांकडे आलीत. या देयकावर स्वास्थ्य अधीक्षक अरुण तिजारे यांची बनावट स्वाक्षरी आढळून आली होती. दरम्यान आयुक्त हेमंत पवार यांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले असून तीन दिवसांत चौकशी अहवाल मागविला आहे. याशिवाय मंगळवारी बनावट स्वाक्षरीबाबत एफआयआर दाखल केले जाणार आहे.गोल्डमॅनने फाडले नोटशिटचे पान !आरोग्य आणि स्वच्छता विभागाशी निगडित आणि साफसफाईची देयके काढून देणाऱ्या साखळीतील एक प्रमुख घटक ‘गोल्डमॅन’ने चक्क बनावट स्वाक्षरी असलेल्या नोटशिटचे पान फाडून नव्याने देयक बनविण्याची प्रक्रिया चालविल्याची कुजबूज महापालिकेत आहे. त्याला संबंधित अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नसला तरी कंत्राटदाराची देयके थांबू नयेत म्हणून नव्याने देयक बनविण्याचे निर्देश दिल्याचे अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सांगितले.‘त्या’ कर्मचाऱ्याकडून ब्लॅकमेलिंग ?महापालिकेत ‘गोल्डमॅन’ म्हणून परिचित एक कर्मचारी साफसफाई कंत्राटदारांना महिन्याकाठी विशिष्ट रकमेसाठी ‘ब्लॅकमेल’करीत असल्याची ओरड आहे. त्याचा तगादा वाढत गेल्याने त्याला टाळून एका संबंधित घटकानेच या ‘गोल्डमॅन’ची बनावट स्वाक्षरी केल्याची चर्चा महापालिकेत आहे तर दुसरीकडे आपल्याला टाळून साफसफाईची देयके अतिरिक्त आयुक्तांकडे जातातच कशी, हा मुद्दा प्रतिष्ठेचा करून बनावट स्वाक्षरीचा घोळ घालण्यात आल्याची शक्यता आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी वर्तविली आहे.