शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चांदूरबाजारमध्ये पॅसेंजरच्या खोळंब्याची कारणे शोधणार

By admin | Updated: May 29, 2014 23:31 IST

जलद रेल्वे गाड्यांना मोर्शी येथे थांबा मिळावा, या मागणीची पूर्तता करणे आपल्या हाती नाही; मात्र चांदूरबाजार येथे पॅसेंजर एक तासपर्यंत खोळंबून राहते. यासंदर्भात आवश्यक ते नियोजन करता येऊ शकेल,

मोर्शी : जलद रेल्वे गाड्यांना मोर्शी येथे थांबा मिळावा, या मागणीची पूर्तता करणे आपल्या हाती नाही; मात्र चांदूरबाजार येथे पॅसेंजर एक तासपर्यंत खोळंबून राहते. यासंदर्भात आवश्यक ते नियोजन करता येऊ शकेल, असे नागपूरचे विभागीय रेल्वे प्रबंधक ओमप्रकाश सिंग यांनी सांगितले. विभागीय रेल्वे प्रबंधक ओमप्रकाश सिंग येथील रेल्वे स्थानकाच्या निरीक्षणाकरिता आले असता स्थानिक विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन अमरावती-नरखेड मार्गावर सुरु असलेल्या दोन साप्ताहिक रेल्वे गाड्यांना मोर्शीला थांबा मिळावा, रेल्वे स्थानकावर संगणकीकृत तिकिटांची आणि आरक्षणाची सोय उपलब्ध करुन द्यावी, रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण वलगावपर्यंत झाले असून कामाला गती देऊन नरखेडपर्यंत विद्युतीकरण व्हावे, रेल्वे स्थानकावर थंड पाण्याची सोय व्हावी, याशिवाय अमरावतीकडे जाणारी पॅसेंजर चांदूरबाजारला जवळपास एक तासपर्यंत थांबविली जाते. पर्यायाने अमरावती, अकोल्याकडे जाणार्‍या प्रवाशांची गैरसोय होते, प्रवासी रेल्वेने जाण्याऐवजी बसने प्रवास करतात, त्यामुळे रेल्वेचे नुकसान होत असल्याची बाब यावेळी किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष देवीदास कापसे, ग्राहक संघटनेचे अध्यक्ष संजय उल्हे, वाहतूकदार रामदास कापसे, कापड विक्रेता संघाचे मिलिंद ढोले इत्यादींनी रेल्वे प्रबंधकांच्या नजरेस आणून दिली. विभागीय रेल्वे प्रबंधक ओमप्रकाश सिंग यांनी प्रतिनिधी मंडळाशी चर्चा करताना एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या थांब्याचा प्रश्न हा थेट रेल्वे मंत्रालयाशी निगडित असल्याचे विशद केले. रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाकरिता जेवढा निधी उपलब्ध होता त्यातून वलगावपर्यंंत विद्युतीकरण झाले. पुढे निधी उपलब्ध होताच विद्युतीकरणाच्या कामाला गती देण्यात येईल, विद्युतीकरणानंतर संगणकीय प्रणाली सुरु करता येईल, असे त्यांनी विशद केले. चांदूरबाजार येथे एक तासापर्यंत पॅसेंजर का थांबविण्यात येते? यासंदर्भात उपस्थित  अधिकार्‍यांशी त्यांनी चर्चा करुन या प्रश्नाची सोडवणूक करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात विभागीय रेल्वे प्रबंधक ओमप्रकाश सिंग हे मोर्शीला आले होते. त्यावेळीसुद्धा विविध संघटनांनी त्यांना या मागण्यांचे निवेदन दिले होते. (तालुका प्रतिनिधी)