तिवसा : तालुक्यातील शेंदूरजना बाजार अंतर्गत ग्रामपंचायत उत्पन्नातून दिव्यांगांना आर्थिक साहाय्य म्हणून व्यवसायाकरिता प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पर्वावर त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सरपंच प्रतीक्षा कुरळकर, शिल्पा खांडेकर, भुयार, आशा चौधरी, दीपाली उमप, रिना वाघमारे, हरिभाऊ निमकर, विशाल सावरकर, अरविंद वेरुळकर, पंकज चौधरी, दीपक सावरकर, किशोर चौधरी, नरेंद्र आसोडे, संदीपसिंह ठाकूर, प्रशांत कुरळकर, सिद्धांत खांडेकर, प्रफुल्ल उमप, एकनाथ देवळे, संजय चौधरी, पवन भोजने, अमोल वैद्य, हरिभाऊ गजबे, हेमंत बोडखे, नीलेश मेश्राम, योगेश देवघरे, शंकर भुसारी, प्रशांत वावरे, उषा गजबे, नर्मदा ढोके, सुशीला बोडखे, विजया आसोडे व गावातील नागरिक उपस्थित होते.
शेंदूरजना बाजार येथे दिव्यांगांना अर्थसाहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:12 IST