प्रभाव लोकमतचाअमरावती : विदर्भ महारोगी सेवा संस्था अर्थात् तपोवन अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या बालगृहातील ११५ मुली व ६६ मुले स्थानांतरित करण्याच्या निर्णयावर अखेर संस्थेच्या नियामक मंडळाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. ३१ डिसेंबरपर्यंत हा निर्णय अंमलात आणला जाईल.नियामक मंडळाचे सदस्य असलेले जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी ही माहिती दिली. संस्थाध्यक्ष मोतीलाल राठी हे यावेळी उपस्थित होते.तपोवनातील बालगृहात वास्तव्यास असलेल्या निराधार व निराश्रित मुलींचे लैंगिक शोषण झाल्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुला-मुलींसाठी ज्या सुरक्षा व्यवस्था आणि सोयी-सुविधा उपलब्ध असायला हव्यात, त्या बालगृहात उपलब्ध नाहीत. त्या उपलब्ध करून देण्याईतपत संस्थेची आर्थिक कुवत नाही. त्यामुळे प्रवेशितांच्या सुरक्षेच्या ृदृष्टीने हा तडकाफडकी निर्णय घेण्यात आला, असे गित्ते यांनी स्पष्ट केले.
अखेर स्थानांतरणावर शिक्कामोर्तब
By admin | Updated: December 27, 2014 00:30 IST