पोलिसात तक्रारही : त्रिसदस्यीय समिती चौकशीत दोष सिध्दपरतवाडा : डी.पी. बसवून देण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांकडून ४० हजार रुपये घेणारा अचलपूर येथील वीज कंपनीचा सहायक कार्यकारी अभियंता फुलचंद मारोती टेंभेकर याला अधीक्षक अभियंत्यांनी अखेर निलंबित केले. त्रिसदस्यीय समितीमध्ये प्राथमिकदृष्ट्या दोष सिध्द झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. धानोरा पूर्णा येथील झाडबाबा परिसरातील जवळपास २० शेतकऱ्यांकडून आक्टोबर २०१४ मध्ये प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे चाळीस हजार रुपये डी.बी. बसवून देण्यासाठी सहायक कार्यकारी अभियंता फुलचंद टेंभेकर याने घेतले होते. एक वर्ष होऊनसुध्दा शेतकऱ्यांची डी.बी. बसविण्यात आली नाही. फुलचंद टेंभेकर यांचेवरील गंभीर आरोपासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. समितीने दिलेल्या अहवालात प्राथमिक दृष्ट्या दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.-दिलीप भुगल, अधिक्षक अभियंताविज वितरण कंपनी, अमरावतीधानोरा पूर्णा येथील शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. चौकशी करुन कारवाही करण्यात येईल.-रिता उईके, ठाणेदार, परतवाडाटेंभेकरची पैसे घेतल्याची कबुलीपरतवाडा : परिणामी त्यांनी १९ आॅक्टोबर रोजी अचलपूर विज कार्यालयात जाऊन अभियंत्याला घेराव घालून जाब विचारला, त्यांना पुन्हा नेहमीप्रमाणे उत्तर देण्यात आले. त्याचवेळी चांदूर बाजार पंचायत समितीचे माजी उपसभापती योगेश पवार तेथे आले. संबंधित शेतकऱ्यांनी त्यांना व्यथा सांगितली. टेंभेकर याला जाब विचारला असता त्याने पैसे घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी त्याची पायदळ वरात काढली होती.समितीच्या अहवालात दोषी‘लोकमत’ मध्ये या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित होताच, अधिक्षक अभियंता दिलीप घुगल यांनी एक त्रिसदस्यीय समितीला अचलपूरात चौकशीसाठी पाठविले. विज वितरण कंपनी (ग्रामीण) चे कार्यकारी अभियंता विजय बेथरिया, मानव संसाधनचे व्यवस्थापक सुहास देशपांडे, विधी अधिकारी एस.डी. चेडे यांनी शेतकऱ्यांचे बयान नोंदवून घेतले. तसेच व्हिडीओ क्लिपची पुन्हा तपासणी केली. त्यामध्ये टेंभेकर याने आपण पैसे घेतल्याची स्पष्ट कबूली दिेली. प्राथमिक चौकशीत दोेषी आढळल्यामुळे फुलचंद टेंभेकरला निलंबीत करण्यात आले. परतवाडा पोलिसात तक्रारअचलपूर विज वितरण कंपनीचे सहा. कार्यकारी अभियंता फुलचंद मारोेती टेंभेकर याने शेतकऱ्यांकडून चाळीस हजार रुपये घेतल्याची तक्रार परतवाडा पोलिसात योगेश पवार व संबंधित सर्व शेतकऱ्यांनी दिली आहे. पैसे घेऊन डी.पी. बसवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात त्यांनी डीबी बसवून दिली नाही.
अखेर वीज अभियंता टेंभेकर निलंबित
By admin | Updated: October 25, 2015 00:10 IST