तिवसा: दहा वर्षांपासून शासनाकडून घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील मोझरी येथील वृध्द निराधार महिला तुळसाबाई नागोराव सावंत यांना घर बांधून देत खासदार नवनीत राणा यांनी वचनपूर्ती केली. काही दिवसांपुर्वी खासदार नवनीत राणा यांनी या जेष्ठ महिलची गावात येऊन भेट घेतली. त्यांनी तात्काळ युवा स्वाभिमान पदाधिकाºयांना या महिलेला सामाजिक निधीतून घरकुल बांधून देण्याचे निर्देश दिले. घरकुल बांधल्यानंतर नववर्षाच्या प्रारंभी त्या वृद्धेचा खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत गृहप्रवेश झाला. यावेळी युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, धीरज केने, पवन भोजने, संजय लांडे, प्रदीप अलोने, सुभाष सोनार, संदेश मेश्राम, तुषार राऊतकर, कुणाल कडू, संदीप चौधरी, दीपक जलतारे, अजय बोबडे, सचिन सोनोने, मंगेश कोकाटे आदी उपस्थित होते.
अखेर मोझरीतील वृद्ध तुळजाबाईला मिळाले घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:14 IST