शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अखेर मेळघाटात आली तपासणी समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 05:00 IST

दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर गुगामल वन्यजीव विभागाचा तत्कालीन निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बलप्रमुख जी. साईप्रकाश यांनी ३१ मार्च रोजी एका समितीचे गठण केले होते. एकूण १६ मुद्द्यांवर ही समिती तपास करणार आहेत. त्यातील पहिल्याच क्रमांकाचा मुद्दा वादग्रस्त ठरल्याने तो बाद करण्यात आला.

ठळक मुद्देपरतवाडा, चिखलदरा, हरिसालमध्ये नोंदविले कर्मचारी, अधिकाऱ्यांचे बयान

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी गठित करण्यात आलेल्या तपासणी समितीने रविवार व सोमवारी परतवाडा चिखलदरा, हरिसाल येथील व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविले. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर गुगामल वन्यजीव विभागाचा तत्कालीन निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बलप्रमुख जी. साईप्रकाश यांनी ३१ मार्च रोजी एका समितीचे गठण केले होते. एकूण १६ मुद्द्यांवर ही समिती तपास करणार आहेत. त्यातील पहिल्याच क्रमांकाचा मुद्दा वादग्रस्त ठरल्याने तो बाद करण्यात आला. त्यानंतर आता १५ मुद्दे घेऊन ही समिती रविवारपासून तीन भागांत अधिकाऱ्यांची टीम तयार करून क्षेत्रीय कर्मचारी-अधिकारी, कार्यालय कर्मचारी-अधिकाऱ्यांचे बयान नोंदविण्यात येत आहे. त्यामध्ये समितीला अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.प्रधान मुख्य वनसंरक्षक माहिती-तंत्रज्ञान व धोरण (नागपूर) एम.के. राव हे समितीचे अध्यक्ष असून, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्तांसह अध्यक्ष मुख्य महाव्यवस्थापक वन विकास महामंडळ (नागपूर) मीरा त्रिवेदी, मेळघाट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, अमरावती वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, सेवानिवृत्त विभागीय वनअधिकारी किशोर मिश्रीकोटकर व  वनपरिक्षेत्र अधिकारी ठाकरे असे या समिती सदस्य आहेत. मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक प्रवीण चव्हाण हे सदस्य सचिव आहेत. 

पहिलाच वादग्रस्त मुद्दा वगळलासमितीला चौकशीसाठी १६ प्रश्नांची मालिका देण्यात आली होती. यात पहिला प्रश्न ‘दीपाली चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी पूर्वीचे सेवा कालावधीत ज्या-ज्या ठिकाणी काम केले आहे, त्या ठिकाणी तसेच हरिसाल येथे कार्यरत असताना अधिनस्थ व वरिष्ठ अधिकारी यांनी त्यांच्यासोबत कशा प्रकारे वागणूक केली’ हा मुद्दाच चौकशी कुणाची, यावर वादग्रस्त ठरल्याने वगळण्यात आला. 

बारा दिवसांनंतर आगमन, नंतर पंधरा मुद्यांवर चौकशी३१ मार्च रोजी समितीचे गठण झाल्यानंतर तब्बल बारा दिवसांनंतर समिती अखेर मेळघाटात दाखल झाली. एकूण १५ मुद्द्यांवर आता अधीनस्थ क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांच्याशी चर्चा करून त्यांचे बयान समिती नोंदवित आहे. त्यामध्ये दैनंदिनी तपासून अनुमान काढणे, विनोद शिवकुमार याने दीपाली चव्हाण यांना किती प्रकरणात कारणे दाखवा सूचना, ज्ञापनपत्र देऊन त्यांचा खुलासा विचारला, पुनर्वसित गावात कितीदा विनोद शिवकुमार याने भेटी दिल्या, मांगिया येथील ॲट्रॉसिटी प्रकरणात नेमके काय घडले, पोलीस अधिकाऱ्यांशी कुठले संभाषण विनोद शिवकुमार याने केले, कुठली नियमबाह्य कामे करण्यास भाग पाडले याची तपासणी, क्षेत्रसंचालक दौऱ्यावर असताना गरोदरपणात पायी चालवल्यामुळे झालेला गर्भपात, चिठ्ठीत लिहिलेल्या कामाचा निधी किती प्रमाणात देण्यात आला, कितीदा दीपाली चव्हाण यांची रजा रद्द करण्यात आली, वनमजूर, कर्मचारी, गावकऱ्यांसमोर विनोद शिवकुमार याने अपमानास्पद वागणूक दिली, अशा विविध पंधरा प्रश्नांवर ही समिती चौकशी करीत आहे. 

अनेक किस्से केले समितीपुढे कथनविनोद शिवकुमार क्षेत्रीय कर्मचारी-अधिकाऱ्यांना रात्री-अपरात्री शासकीय गणवेशात बोलवायचा व तेथून बेपत्ता व्हायचा. अनेकदा कर्मचाऱ्यांना त्याने असा मानसिक त्रास दिला. त्याचे मद्यपान, मटण पार्ट्या, अपमानास्पद वागणूक आदी किस्स्यांचा पाढा कर्मचाऱ्यांनी समितीपुढे लेखी स्वरूपात मांडल्याची माहिती आहे. क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी-अधिकारी महिला कर्मचाऱ्यांचेही बयान सोमवारी सकाळी नोंदवून समिती हरिसाल येथे सायंकाळपर्यंत चौकशी करीत होती.

 

टॅग्स :Deepali chavanदीपाली चव्हाणforest departmentवनविभाग