शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अखेर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2016 23:53 IST

प्रथमेश सगणे याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी अखेर शुक्रवारी रात्री अज्ञात इसमाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.

अमरावती : प्रथमेश सगणे याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी अखेर शुक्रवारी रात्री अज्ञात इसमाविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. सुरुवातीला प्रथमेशने स्वत:च स्वत:वर वार केल्याचा कांगावा करणाऱ्या पोलिसांना ‘लोकमत’ने केलेल्या दमदार पाठपुराव्यामुळे हा गुन्हा दाखल करावाच लागला. सामाजिक संघटनांनी आवाज बुलंद केल्याने पोलिसांवर दबाव निर्माण झाला. दत्ता महादेव खंडारे (३१, रा. अमरावती) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला. तक्रारकर्ता हे प्रथमेशचे मामा आहेत. प्रथमेशवर अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे. पोलिसांना त्यांच्या तपासात कुठलाही निष्कर्ष काढता न आल्याने तांत्रिक सोयीसाठी त्यांनी प्रथमेशच्या मामांकडून तक्रार मागविली. त्यानुसार भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. (प्रतिनिधी)प्रथमेश पोलीस निगराणीतपोलीस उपनिरीक्षक आणि एका पोलीस शिपायाची नियुक्ती नागपूर येथील प्रथमेशवर उपचार सुरू असलेल्या खासगी इस्पितळात करण्यात आली आहे. प्रथमेशला भेटणाऱ्यांवर त्यांची नजर आहे. प्रथमेशच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला.प्रथमेशवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शाळेतील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांचे बयाण नोंदविण्यात आले. प्रथमेशची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. त्याच्या बयाणावरूनच या हल्ल्याचे रहस्य उलगडेल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. - श्रीनिवास घाडगे,पोलीस उपअधीक्षक, अमरावती