शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड-१९’ उल्लेख वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 22:03 IST

राज्यात कृषी विद्यापीठांतील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील ‘प्रमोटेड कोविड-१९’ हा उल्लेख वगळण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहाविद्यालयांना ‘कारणे दाखवा’ : कृषिमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश, दोषींवर होणार कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कअमरावती : राज्यात कृषी विद्यापीठांतील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील  ‘प्रमोटेड कोविड-१९’ हा उल्लेख वगळण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांना मंगळवारी याबाबत कळविले.‘लोकमत’ने मंगळवारी ‘कृषी विद्यापीठात ‘प्रमोटेड कोविड-१९ गुणपत्रिका’ या आशयाची बातमी प्रकाशित केली. या वृत्ताच्या माध्यमातून कृषी पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना वितरित होणाऱ्या गुणपत्रिकेवर कोविड-१९ बाबत शिक्का असणार होता. तशी तयारी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी चालविली होती. मात्र, ‘लोकमत’ने ही बातमी प्रकाशित करून कृ षी विद्यापीठांचे मनसुबे हाणून पाडले. या वृताची दखल राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे. राज्य शासनाचे कोणतेही आदेश नसताना कृषी पदवी अभ्यासक्रमाला असलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ उल्लेख कोणी केला, याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई होणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी घोषणा केली आहे. तसेच  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील परीक्षा विभागातील गुणपत्रिकेच्या फारमॅटवरून ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा उल्लेख वगळण्यात आला आहे. मंगळवारी दिवसभर मंत्रालयातही ‘लोकमत’मध्ये प्रकाशित बातमीची चर्चा होती, हे विशेष.

कृषी विद्यापीठाचे महाविद्यालयांना नोटीसअकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड-१९’ गुणपत्रिकेवर उल्लेख असल्याप्रकरणी संलग्न महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयांमध्येही एकच खळबळ उडाली आहे. कोविड-१९ असा शिक्का कृषी विद्यापीठानेच पाठविला असताना आता ‘कारणे दाखवा’ हा नवा वाद निर्माण होणार आहे. राज्य शासनाने याप्रकरणी चारही कृषी विद्यापीठांना शो-कॉज दिल्या आहेत. कृषी विद्यापीठाने ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा गुणपत्रिकेवरील उल्लेख वगळला आहे. आता विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येतील. तसे कृषी विद्यापीठातील परीक्षा विभागाने कळविले आहे.शशांक देशमुख, प्राचार्य, श्री शिवाजी कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर

टॅग्स :Amravatiअमरावतीagricultureशेतीuniversityविद्यापीठ