शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

बोंद्रेंची चौकशी अंतिम टप्प्यात

By admin | Updated: July 26, 2016 00:30 IST

महापालिकेतील सहाय्यक पशूशल्यचिकित्सकांची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

उपायुक्तांकडे जबाबदारी : नियमबाह्य नियुक्तीचे प्रकरणअमरावती : महापालिकेतील सहाय्यक पशूशल्यचिकित्सकांची चौकशी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. चपराशीपुरा येथील महम्मद शाहेद रफिक यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने नगरविकास विभागाने बोंद्रेबाबतचा अहवाल पाठविण्याच्या सूचना आयुक्तांना केल्या होत्या. बोंद्रे यांच्या तथाकथित नियमबाह्य नियुक्तीची चौकशीला मनपास्तरावर वेग आला आहे. सहाय्यक पशूशल्य चिकित्सक पदावर करण्यात आलेली बोंद्रेंची नियुक्ती रद्द करावी, अशी सप्रमाण तक्रार महम्मद शाहेद रफिक यांनी १८ मे रोजी नगरविकास विभाग मंत्रालयात केली. त्या तक्रारीची दखल घेत नगरविकास विभागाने २० जूनला महापालिका आयुक्तांना याबाबत पत्र दिले. महाराष्ट्र शासनाचे कक्ष अधिकारी शशीकांत योगे यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र आहे. सहाय्यक पशूशल्य चिकित्सक (कंत्राटी) पदासाठी आवेदन करताना खोटी माहिती दिल्याबद्दल म. शाहेद यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अर्जदाराला आपल्या स्तरावर उत्तर देण्यात यावे व त्याची प्रत नगरविकास विभागास सादर करण्याच्या त्या सूचना होत्या. त्यावर आयुक्त हेमंत पवार यांनी या प्रकरणाची चौकशी करून अभिप्रायासह १५ दिवसात अहवाल सादर करा, असे निर्देश उपायुक्त (साप्रवि) यांना दिलेत. आयुक्तांच्या सुचनांच्या अनुषंगाने उपायुक्तांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केलीे. हा अहवाल अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. लवकरच तो आयुक्तांमार्फत नगरविकास विभागाकडे पाठविला जाईल. दरम्यान सचिन बोंद्रे यांची नियुक्ती करतेवेळी तत्कालिन अधिकाऱ्यांनी बोंद्रे यांनी पुरविलेल्या अनुभव प्रमाणपत्रासह अन्य दस्ताएैवजांची सत्यता पडताळून पाहिली नसल्याचा प्राथमिक ठपका ठेवण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. महानगरपालिका हद्दीतील कत्तलखाना बंद असताना सचिन बोंद्रे यांनाच नियुक्ती का? असा प्रश्नही तत्कालिन वेळी उपस्थित करण्यात आला होता. मात्र राजकीय दबावापोटी बोंद्रे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे निरीक्षण चौकशी अधिकाऱ्यांनी नोंदविली असल्याचे समजते. (प्रतिनिधी)नियुक्तीची फाईल बोंद्रे यांच्याकडेसुत्रानुसार, तत्कालिन मुख्यमंत्र्यांकडे आमदाराने केलेल्या शिफारशीने बोंद्रे यांच्यासाठी पदनिर्मिती करण्यात आली. बोंद्रे महापालिकेत सेवा देऊ लागले. मात्र त्यांच्या नियुक्तीचे कुठलाही दस्ताएैवज सामान्य प्रशासन विभागाकडे उपलब्ध नसल्याची माहिती आहे. त्यांच्या नियुक्तीची फाईलही त्यांनी स्वत:कडेच ठेवल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. नगरविकास विभागाच्या पत्रानुसार सचिन बोंद्रे यांच्या नियुक्तीबाबतची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. लवकरच अहवाल सादर करू.- विनायक औगड,उपायुक्त, प्रशासन