आयुक्तांच्या आदेशाचे पालन : एडीटीपी विभागाची कारवाईअमरावती : स्थानिक कॅम्प परिसरातील हॉटेल ‘ग्रँड महेफील इन’च्या बांधकामाची गुरुवारी तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या सहायक संचालक नगररचना विभागाच्या चमुने ही तपासणी केली आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार शहरात २८ मोठ्या प्रतिष्ठानांच्या बांधकामांची तपासणी करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार ग्रँड महेफीलची तपासणी करण्यात आली. २०१२-१३ या वर्षात ग्रँड महेफीलच्या बांधकामाला महापालिकेने परवानगी दिली होती. मंजूर नकाशानुसार बांधकाम झाले अथवा नाही, याची चाचपणी केली जाणार आहे. यापूर्वी हॉटेल महेफील इनच्या बांधकामाची तपासणी करण्यात आली आहे. या दोन्ही हॉटेलच्या बांधकाम तपासणीचा अहवाल एडीटीपी सुरेंद्र कांबळे सोमवारी आयुक्त गुडेवार यांना सोपवतील, अशी माहिती आहे. ग्रँड महेफीलच्या तपासणीत हेमंत महाजन, घनश्याम वाघाडे, विंचुरकर, भटकर आदी अभियंते सहभागी असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
अखेर ग्रँड महेफीलची तपासणी
By admin | Updated: June 26, 2015 00:30 IST