लोकमत न्यूज नेटवर्कचांदूररेल्वे : धामणगाव रेल्वे मतदारसंघासह जिल्ह्याच्या सिंचन विभागाशी संबंधित प्रलंबित विविध मुद्दे आ. वीरेंद्र जगताप यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडले. नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरावती जिल्ह्यासाठी आढावा बैठक पार पडली. सिंचन क्षेत्रातील रिक्त पदांच्या भरतीचा मुद्दा आ. जगताप यांनी उपस्थित केला. यावर मुद्द्यांवर लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.अमरावती जिल्ह्यातील ऊर्ध्व वर्धा सिंचन मंडळ, अमरावती पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांच्याकडील एकूण २२ शाखांनुसार प्रत्येकी २२ अशी ४८४ पदे रिक्त आहेत. याशिवाय सिंचन व्यवस्थापनाकरिता २८ पदे रिक्त आहेत. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पदभरती करून रुग्णसेवा सुरू करावी. वरूड बगाजी, शेंदूरजना खुर्द, वेणी गणेशपूर, बग्गी उपकेंद्राच्या इमारतीला एक वर्ष होऊनही रुग्णसेवा सुरू झाली नाही.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेतील नवीन वा खचलेल्या विहिरीसंदर्भात उन्हाळा संपला तरी लाभार्थींना प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. शेतकºयांना कर्ज मिळाले नाही. कळमजापूर (ता. चांदूर रेल्वे) येथील लाभार्थी घरकुल योजनेत अर्थसाहाय्य मिळण्यासाठी एक वर्षापासून प्रतीक्षेत आहेत. याबाबत आदेश देण्यात यावेत, अशी मागणीही आ. जगताप यांनी मांडली.
सिंचन विभागातील अनुशेष भरून काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:36 IST
धामणगाव रेल्वे मतदारसंघासह जिल्ह्याच्या सिंचन विभागाशी संबंधित प्रलंबित विविध मुद्दे आ. वीरेंद्र जगताप यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडले. नागपूर येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अमरावती जिल्ह्यासाठी आढावा बैठक पार पडली. सिंचन क्षेत्रातील रिक्त पदांच्या भरतीचा मुद्दा आ. जगताप यांनी उपस्थित केला.
सिंचन विभागातील अनुशेष भरून काढा
ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : पावसाळी अधिवेशनात जिल्ह्यातील विविध मुद्यांवर चर्चा