शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीचाही गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 22:19 IST

अंधश्रद्धेचा फायदा घेत भोळ्या भाबड्या भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या पवन घोंगडे महाराजविरुद्ध आता गाडगेनगर पोलिसांनी फसवणुकीचाही गुन्हा नोंदविला आहे. पवन महाराज मोकाट असून तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून त्याचा कसून शोध सुरू आहे.

ठळक मुद्देतांत्रिक पद्धतीने शोध सुरू पिशवी भरून साहित्य नेणारी ‘ती’ महिला मोकाटच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंधश्रद्धेचा फायदा घेत भोळ्या भाबड्या भाविकांकडून पैसे उकळणाऱ्या पवन घोंगडे महाराजविरुद्ध आता गाडगेनगर पोलिसांनी फसवणुकीचाही गुन्हा नोंदविला आहे. पवन महाराज मोकाट असून तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून त्याचा कसून शोध सुरू आहे.पवन महाराजच्या आई-वडिलांना गाडगेनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर पवन महाराजाच्या घरी एक तरुणी गेली होती. तिने पवन महाराजाच्या घरातून दोन पिशव्या भरून साहित्य नेल्याचे तेथील रहिवाशांनी प्रत्यक्ष पाहिले. तिने काही आक्षेपार्ह साहित्य नेल्याची चर्चा आहे.तंत्रविद्येतून नागरिकांची दिशाभूलया घटनेला आठ दिवस ओलांडून गेलेत, मात्र, अद्यापपर्यंत पोलिसांनी त्या महिलेची चौकशी केलेली नाही. पोलिसांनी त्या महिलेला ठाण्यात बोलाविले. मात्र, ती हजर झाली नाही. पवन महाराज अंगात देवी येण्याचे सोंग करून तंत्रविद्येच्या माध्यमातून नागरिकांची दिशाभूल करीत होता. अंधश्रद्धाळू भक्तांना अंगारा देत, त्यांचे दु:ख निवारण्याचा आव आणत होता. या मोबदल्यात तो भक्तांकडून पैसे किंवा साहित्य घेत होता. ही एकाप्रकारे शुध्द फसवणूकच आहे. शनिवार, मंगळवार, पौर्णिमा, अमावशा व नवरात्रीत पवन महाराज अंगात देवी येण्याचे सोंग करून भक्तांच्या समस्या व आजार दूर करण्यासाठी अंगारा, नारळ किंवा अन्य साहित्य देऊन शुद्ध फसवणूकच करायचा. ही बाब लक्षात घेता गाडगेनगर पोलिसांनी पवन महाराजाविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात भादंविच्या कलम ४२०(फसवणूक)ची वाढ केली आहे.पवन महाराजची पंढरपूर वारीपवन महाराजाच्या आई-वडिलांना अटक झाल्यानंतर तो मुंबई किंवा नाशिकला गेल्याचेही ऐकीवात आले. दोन दिवसांपूर्वी पवन महाराज जामगाव किंवा रहाटगावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, तो मिळाला नाही. पवनच्या आई-वडिलांच्या बयाणानुसार, पवन हा आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीला गेला आहे. पवनजवळ मोबाईल नाही. त्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे पवनजवळील चारजणांचे मोबाईल क्रमांकांच्या आधारे पोलीस शोधत आहे.पवन महाराज मोबाईल वापरत नसल्यामुळे त्याचे लोकेशन ट्रेस करणे अवघड झाले आहे. मात्र, तांत्रिक पद्धतीचा अवलंब करून पवनचे शोधकार्य सुरू आहे.- मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे