रामापूर येथील घटना : आर्थिक व्यवहार झाल्याचा संशयअंजनगाव सुर्जी : अचलपूर तालुक्यातील उपातखेडा या आदिवासी गावातील एका युवतीने पथ्रोट आरोग्य केंद्रात बुरखा घालून व मुस्लिम वाटणारे नाव नोंदवून एका बाळाला जन्म दिला आणि हे अपत्य पथ्रोट नजीकच्या रामापूर गावातील मुस्लिम निपुत्रिक कुटुंबाला दिले. परंतु या मुस्लिम कुटुंबातील लहान भावाने १८ जून रोजी पथ्रोट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून त्याच्या मोठ्या भावासह आईने आदिवासी युवतीचे मूल विकत घेतल्याचे सांगितले होते. या तक्रारीच्या आधारे पथ्रोट पोलिसांनी भादंविच्या कलम ४१९ अन्वये आदिवासी युवती, या प्रकरणातील गोंडवाघोली येथील मध्यस्थ व मूल विकत घेणाऱ्या मुस्लिम दाम्पत्याविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. विस्तृत माहितीनुसार, २२ मे रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास एक बुरखाधारी युवती एका महिलेसह प्रसूतीसाठी पथ्रोट केंद्रात आली. मागणी करूनही त्यांनी एकही ओळखपत्र सादर केले नाही. युवतीची प्रसूतीची वेळ जवळ आली होती. अवघ्या दहा मिनिटांतच ती प्रसूत झाली. तिने आरोग्य केंद्राच्या रजिस्टरवर तिचे नाव आसियाबी मो. जावेद (रा.रामापूर) असे नोंदविले होते. प्रसूतीनंतर तिने स्वत:चे मूल रामापूर येथील अपत्य होत नसलेल्या दाम्पत्य आसियाबी व मो. जावेद यांना सुपूर्द केले. यात आर्थिक व्यवहार तर झाला नसावा? या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. या दाम्पत्याला दहा वर्षांपासून मूलबाळ नव्हते. परंतु १८ जून रोजी या मो. जावेद यांच्या लहान भावाने पथ्रोट ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर ठाणेदार गावंडे व तपास अधिकारी सुभाष फुंदे यांनी तपास केला असा हा प्रकार उघडकीस आले. तपासात सदर युवती अविवाहित असल्याचे व तिला प्रेमप्रकरणातून गर्भधारणा झाल्याचे स्पष्ट झाले. गर्भवतीच्या काळात ती गोंडवाघोली येथे नातलगांच्या घरी आली. येथील एका मध्यस्थानेच तिचा रामापूरच्या दाम्पत्याशी परिचय करून दिला होता. मात्र, अद्याप युवतीने तिच्या कथित प्रियकराविरूध्द कोणतेही बयाण दिले नाही. या प्रकरणाचा तपास अहवाल अद्याप यायचा आहे. या घटनेमुळे धास्तावलेल्या पथ्रोट आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून प्रसूतीकरिता येणाऱ्या महिलांची ओळख पटवि (तालुका प्रतिनिधी)कायद्याबाबतचे अज्ञान व मूल दत्तक घेण्याची प्रक्रिया माहीत नसल्याने अपत्य नसलेल्या दाम्पत्याकडून हे कृत्य घडल्याचे प्रथमदर्शनी वाटते. तपास अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर मी स्वत: याप्रकरणी फिर्याद देऊन कुमारी मातेचे प्रकरण हाताळणार.- गजानन पडघन, ठाणेदार, अंजनगाव सुर्जी.प्रसूतीसाठी काही काळ शिल्लक होता. त्यामुळे महिलेची चौकशी करण्यापेक्षा तिला त्या अवघड स्थितीतून सोडविणे गरजेचे होते. म्हणून या प्रकरणात युवतीची ओळख न पटविता प्रसूती करून घेतली. परंतु यापुढे योग्य ती खबरदारी घेऊ- सचिन गोळे,वैद्यकीय अधिकारी, पथ्रोट.नवजात सध्या महिला-बालकल्याण विभागाकडेजन्मलेला नवजात बालक तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस विभागाने महिला व बालकल्याण विभाग, अमरावतीकडे दिले आहे. बाळाची डीएनए तपासणीची प्रक्रिया विचाराधीन आहे.
मूल विकत घेणाऱ्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल
By admin | Updated: July 15, 2015 00:17 IST