शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:09 IST

श्रीनिधीच्या वडिलांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, खाजगी कोचिंग क्लासने चिखलदरा सांगून चिचाटीत नेले चिखलदरा : चिखलदऱ्याला नेणार असल्याचे सांगून चिचाटी ...

श्रीनिधीच्या वडिलांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, खाजगी कोचिंग क्लासने चिखलदरा सांगून चिचाटीत नेले

चिखलदरा : चिखलदऱ्याला नेणार असल्याचे सांगून चिचाटी धबधब्यावर गेलेल्या सहलीत माझ्या तरुण मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू हा संशयास्पद आहे. प्रकरणाचा तपास करून यासाठी जबाबदार सहल आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत युवकाचे वडील प्रवीण सकळकळे (रा. वृंदावन वसाहत, अमरावती) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे शुक्रवारी एका तक्रारीतून केली.

श्रीनिधी प्रवीण सकळकळे (१७) या विद्यार्थ्याचा १३ जुलै रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास चिचाटी धबधब्यावर पाण्यात बुडून मृत्यू झाला. चार दिवस उलटून गेल्यावरही सहल काढणारे कोचिंग क्लासचे आयोजक या विषयात उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. अन्य विद्यार्थ्यांवरदेखील सहल आयोजक दबाव टाकत आहेत. श्रीनिधीच्या मृत्यूचा कोचिंग क्लासचे प्रमुख व त्यांचे सर्व सहकारी कारणीभूत असल्याचा आरोप जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

बॉक्स

चिखलदरा सांगितले, चिचाटीला नेले

चिखलदऱ्याचे नाव सांगून दुर्गम चिचाटी जंगलात सहल नेली. पालकांना कुठलाच तपशील दिला नाही. श्रीनिधीच्या संशयास्पद मृत्यूनंतर सर्व प्रकारच्या हालचाली काही तरी लपवले जात असल्याकडे निर्देश करतात, असा आरोप होत आहे. श्रीनिधीच्या मृत्यूमुळे सकळकळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण वृंदावन वसाहतमध्ये शोककळा पसरली आहे.

बॉक्स

१०७ विद्यार्थ्यांना नेले सहलीला

कोरोनाकाळात गर्दी जमवण्यास परवानगी नसताना न्यू प्रभात कॉलनीतील क्लासच्या संचालकाने १०७ विद्यार्थ्यांची सहल काढली. त्यांच्यासोबत केवळ चार शिक्षक होते. पालकांना या घटनेसंदर्भात कुठल्याच प्रकारची माहिती दिली नाही. धांदात वारंवार खोटे सांगण्यात आले. पालकांना अपमानास्पद वागणूक दिली गेली. विद्यार्थ्यांना या घटनेसंदर्भात कुठलीच वाचता न करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. एकंदर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कोचिंग क्लासच्या संचालकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना करण्यात आली आहे.