शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

बडनेऱ्यात महापालिका पथकाशी हुज्जत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने चिल्लर व ठोक विक्रीबाबत भाजी व फळविक्रेत्यांना मनाई केली आहे. मनपा प्रशासनाच्या गस्ती पथकाने अनेकदा ध्वनिप्रक्षेपकाद्वारे सूचना दिल्यानंतरही हातगाड्या लावल्या जातात. गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या गस्ती पथकाला कुरेशीनगरात गर्दी निदर्शनास आली. त्याठिकाणी भाजीपाल्याच्या तीन हातगाड्या दिसून आल्या. त्यांच्याकडे महापालिकेची परवानगी नव्हती.

ठळक मुद्देकुरेशीनगरातील घटना : भाजीबाजार भरविला; तिघांविरुद्ध गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : येथील कुरेशीनगरात महापालिकेचे गस्ती पथक संचारबंदीत भरविलेला भाजीबाजार उलथवून जप्तीची कारवाई करीत असताना त्यांच्याशी विक्रेत्यांनी हुज्जत घातली. यावेळी विरोध करणाऱ्यांनी मोठा समूह केला होता. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाले आहेत.मोहम्मद जावेद मोहम्मद रफीक (४८), फिरोज खान बब्बू खान (३५), अब्दुल मजीद अब्दुल रजाक (६५, तिघेही रा. बडनेरा) असे गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने चिल्लर व ठोक विक्रीबाबत भाजी व फळविक्रेत्यांना मनाई केली आहे. मनपा प्रशासनाच्या गस्ती पथकाने अनेकदा ध्वनिप्रक्षेपकाद्वारे सूचना दिल्यानंतरही हातगाड्या लावल्या जातात. गुरुवारी सकाळी ११ वाजता मनपाच्या गस्ती पथकाला कुरेशीनगरात गर्दी निदर्शनास आली. त्याठिकाणी भाजीपाल्याच्या तीन हातगाड्या दिसून आल्या. त्यांच्याकडे महापालिकेची परवानगी नव्हती. तोंडाला मास्क बांधले नव्हते. यामुळे तीनही हातगाड्या जप्त करण्याची कारवाई सुरू असताना या विक्रेत्यांनी समूह करून पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली. हातगाड्या घेऊन जाण्यास विरोध केला. या घटनेत महापालिका झोन ४ चे सहायक क्षेत्रीय अधिकारी राजेश मनोहरपंत चिंचमलातपुरे याच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी तिघांविरुद्ध भादंविचे १८६, १८८, २६९, २७१ सहकलम ५१ (ब) राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.बडनेऱ्यात संचारबंदीचे सातत्याने उल्लंघनबडनेऱ्यात कोरोना संसर्गाचे दोन रुग्ण आहेत. कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे. मात्र, प्रशासनाच्या विनंतीनंतरही काही लोक संचारबंदीचे उल्लंघन करीत आहेत. शासकीय कामकाजात येथे सारखा अडथळा केला जात आहे. जुनीवस्तीत दोनदा पोलिसांवर हात उगारला गेला. शिवीगाळ करण्याचे प्रकार झाले आहेत.मनपाकडून तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. प्रशासनाला सहकार्य करा, असे सर्वांना आवाहन करतो.- पंजाब वंजारीपोलीस निरीक्षक, बडनेराकुरेशीनगरात गर्दी दृष्टीस पडली. संचारबंदीचे येथे पूर्णत: उल्लंघन केले होते. मनपाचे गस्ती पथक तेथे गेले असता, हातगाडीवर भाजी विकणाऱ्यांनी हुज्जत घातली.- राजेश चिंचमलातपुरेसहायक क्षेत्रीय अधिकारी

टॅग्स :Marketबाजार