शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कामगारांच्या पेन्शनसाठी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 22:03 IST

कृषिउत्पन्न बाजार समितीचा कणा असलेल्या हमाल, माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनस्तरावर लढा उभारू, अशी ग्वाही आमदार रवि राणा यांनी कामगार मेळाव्यात दिली.

ठळक मुद्देरवि राणा : म्हाडाच्या निवासी संकुलात १० टक्के आरक्षण द्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कृषिउत्पन्न बाजार समितीचा कणा असलेल्या हमाल, माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनस्तरावर लढा उभारू, अशी ग्वाही आमदार रवि राणा यांनी कामगार मेळाव्यात दिली.येथील बाजार समितीत हमाल, माथाडी कामगार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील दुवा असलेले हमाल, माथाडी कामगार दुर्लक्षित राहू नये, ही बाब आ. राणांनी स्पष्ट केली. हमाल, माथाडी कामगार कायम कष्टकरी आहे. त्यांचे श्रम, घामाचे मोल समजून या घटकासाठी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊ, असे त्यांनी जाहीर केले. तसेच म्हाडातील निवासी संकुलात १० टक्के आरक्षणाची मागणीदेखील शासनाकडे केली जाईल, असे ते म्हणाले. बडनेऱ्यात हमाल, माथाडी कामगारांसाठी चार कोटी रूपये खर्चून कामगार भवन साकारले जाणार आहे. मात्र, प्रशासनाने अद्यापही जागेसाठी ५० लाख रूपये भरण्याची अट लादल्याने अजूनही जागेचा प्रश्न कायम असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. हमाल, माथाडी कामगार ५० लाख रूपये कोठून भरणार असा सवाल आमदार राणांनी उपस्थित केला. तरी देखील आपण शासनस्तरावर सातत्याने प्रयत्नरत आहे. लवकरच ५० लाख रूपये जागेचे भरण्याबाबतची सूट मिळविणार असेही ते म्हणाले. मेळाव्याचे आयोजक बाजार समितीचे संचालक बंडू वानखडे यांच्या कार्याचे आमदार राणांनी कौतूक केले.यावेळी बाजार समितीचे अध्यक्ष अशोक दहिकर, बाबा अढाव, बंडू वानखडे, विनोद गुहे, धुरड, लोंडे, विष्णू साबळे, अशोक सावळे, शिवाजी तावडे, मोहम्मद असद, विजू जाधव, विनायक तारापुरे, विठ्ठलरााव कंगाले, बाबू गजभे, अशोक खडसे आदींची उपस्थिती होती.