शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी सात महिन्यांपासून अखर्चित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:10 IST

अमरावती : कोरोनाच्या संकटामुळे विकासकामांचा ३३ टक्‍क्‍यांनी निधी कमी झाला असला तरी १५ व्या केंद्रीय ...

अमरावती : कोरोनाच्या संकटामुळे विकासकामांचा ३३ टक्‍क्‍यांनी निधी कमी झाला असला तरी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाचा जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींना १४४ कोटींचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायतींना दिलासा मिळाला होता. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे १५ व्या वित्त आयोगाचा निधी गत सात महिन्यांपासून प्रलंबित असल्याने ग्रामपंचायत अंतर्गतच्या विकासकामांना ब्रेक लागला आहे.

जिल्ह्यातील १४ तालुक्यांतर्गत ८४० ग्रामपंचायतींना १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत विविध टप्प्यात १४४ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून ग्रामपंचायतीच्यावतीने बंदिस्त व इतर कामांची आखणी करण्यात आली. किती निधी कोणत्या योजनांवर खर्च करायचा याबाबत दिशानिर्देश देण्यात आल्यामुळे ग्रामपंचायतीकडून पिण्यासाठी पाणी पुरवठा, पावसाचे पाणी संकलन व पाण्याचा पुनर्वापर, प्राथमिक शाळा, अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांसाठी मुत्रीघर व शौचालय बांधणे, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डे, भूमिगत व बंदिस्त गटारे बांधकाम, पाणीपुरवठ्यासाठीची कामे, आरो मशीन बसून एटीएमद्वारे पाणीपुरवठा करणे, हातपंप, वीज पंप व पाणी योजनांची दुरुस्ती करणे, शाळा खोली दुरुस्ती, मैदान तयार करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांना आरोग्य साहित्य पुरविण्यास विविध विकासकामांचा समावेश आहे. १५ वा वित्त आयोग अंतर्गत गत पाच महिने अगोदर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, यामध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे हा निधी खर्च करण्यास ग्रामपंचायतींसमोरही पेच निर्माण झाला आहे.

बॉक्स

विकासकामे खोळंबली

पंधराव्या वित्त आयोग अंतर्गत देयके अदा करण्याचे काम पंचायत समितीऐवजी पीएफएमएस सिस्टीम देण्यात आल्याने ग्रामीण भागातील विकास कामांना खीळ बसली असून पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम असून अडचण नसून खोळंबा असल्याचे ग्रामसेकांमध्ये बोलले जात आहे.

बॉक्स

असे आहेत निकष

शासनाने ५० टक्के अबंधित व ५० टक्के बंधित असे निधी खर्च करावयाचे निकष आहेत. मात्र, चालू वर्षात केंद्र सरकारने हे निकष बदलून ६० टक्के अबंधित तर ४० टक्के बंधित असे नवीन निर्देश दिल्याने काम करू पाहणारे चांगलेच गोंधळून गेले आहेत. १४ व्या वित्त आयोगात सर्व निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा करून कामे झाल्यानंतर पंचायत समिती स्तरावर संबंधितांना देयके अदा करण्यात येत होते. आता मात्र यात बदल केला आहे.