शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

पोहरा जंगलात भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:13 IST

१० हेक्टर जंगल जळून खाक, पोहरा जंगलातील घटना, वन्यजीव बचावले पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोहरा वर्तुळातील पोहरा ...

१० हेक्टर जंगल जळून खाक, पोहरा जंगलातील घटना, वन्यजीव बचावले

पोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोहरा वर्तुळातील पोहरा बीट वनखंड क्रमांक ४० मध्ये बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारे १० हेक्टर जंगल जळून खाक झाले. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले होते. जोराचा वारा असल्याने ही आग पसरत गेल्याने पोहरा जंगातील १० हेक्टर वनक्षेत्र आगीने भक्ष्य केले.

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन ते तीन बोलेरो मशीनचा वापर करण्यात आला. या आगीत जंगलातील गवत पूर्णपणे खाक झाले असून, मोठ्या वृक्षांनाही आगीचा फटका बसला आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात पोहरा बीट वनरक्षक डी.ओ.चव्हाण, संरक्षण मजूर योगेश राठोड, सुमेरसिंग जाधव, रशिद पठाण यांच्या अथक प्रयत्नानंतर २ वाजताच्या सुमारास ही आग नियंत्रित करण्यात यश आले. वडाळी वनपरिक्षेत्रात उन्हाळ्यापूर्वीच हिवाळ्यात आगीच्या मालिका सातत्याने सुरूच आहे. ही आग अमरावती-चांदूर रेल्वे महामार्गाच्या बोडणा मार्गावर पोहोचली होती. या आगीत कोणत्याही वन्यजीवाचे नुकसान झाले नाही. जंगलात आग लागल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनगुन्हा जारी करण्यात आला आहे.

बॉक्स

आग नियंत्रणासाठी आधुनिक व पारंपरिक पद्धतीचा वापर

आग नियंत्रणात आणण्यासाठी दोन ते तीन बोलेरो मशीन व पारंपरिक पद्धतीने पळसाच्या मोठ्या फांद्याच्या वापर करण्यात आला. सोसाट्याचा वारा असल्याने पोहरा जंगलात आगीने रौद्ररुप धारण केले होते. जंगल वेगाने जळत असताना, वन्यप्राण्यांनी झपाट्याने स्थान बदलविले.