शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सेवानिवृत्तांच्या आडून स्वेच्छानिवृत्तांसाठी ‘फिल्डिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:59 IST

विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी सेवेत घेण्याच्या आडून स्वेच्छानिवृत्तांसाठी ‘फिल्डिंग’ लावण्यात आली आहे. १७ डिसेंबर २०१६ चा शासननिर्णयातील पळवाट शोधून ‘त्या’ स्वेच्छानिवृत्त अधिकाºयाची महापालिकेत ‘एन्ट्री’ करवून घ्यायची अन् त्यानंतर त्याला ‘शहर अभियंता’ पदावर बसवायचे, अशी खेळी रचण्यात आली आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय अनियमिततेस वाव : आयुक्तांपुढे ‘डाव’ ओळखण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना कंत्राटी सेवेत घेण्याच्या आडून स्वेच्छानिवृत्तांसाठी ‘फिल्डिंग’ लावण्यात आली आहे. १७ डिसेंबर २०१६ चा शासननिर्णयातील पळवाट शोधून ‘त्या’ स्वेच्छानिवृत्त अधिकाºयाची महापालिकेत ‘एन्ट्री’ करवून घ्यायची अन् त्यानंतर त्याला ‘शहर अभियंता’ पदावर बसवायचे, अशी खेळी रचण्यात आली आहे.तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांनी जीवन सदार यांना सेवानिवृत्त शासननिर्णयाचा आधार घेऊन राजापेठ ओव्हरब्रिज या विवक्षित कामाव्यतिरिक्त शहर अभियंता या नियमित पदाचा बेकायदा कार्यभार दिला. पवारांचा इतका वकूब होता की, त्या बेकायदेशीर नियुक्तीबाबत नगरविकास विभागाने ‘ब्र’ काढला नाही की कुण्या नगरसेवकाला (ंअपवाद जयश्री कुºहेकरांचा) सदार यांची नियुक्ती बेकायदेशीर वाटली नाही. सदारांचा तीन वर्षांचा कंत्राटी कार्यकाळ जूनमध्ये संपुष्टात आला व पवारांच्या बदलीने त्यांच्या पुनर्प्रवेशालाही खोडा बसला. त्यानंतर प्रतिनियुक्तीचा अधिकारी न आल्याने पालिकेने स्वेच्छानिवृत्त अधिकाºयांसाठी जाहिरात दिली. छत्रीतलाव, राजापेठ अशा विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त अभियंत्याकडून अर्ज मागविले. त्या पार्श्वभूमीवर पालिकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या एका अभियंत्यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. महापालिका सेवेत असताना अनेक नगरसेवक या अभियंत्यांचे लाभार्थी होते. त्यामुळेच या मर्जीतील स्वेच्छानिवृत्त अभियंत्याला जाहिरातीवाटे महापालिकेत आणायचे आणि हेमंत पवार आणि जीवन सदार या जोडगोळीचा संदर्भ घेत त्याला शहर अभियंता म्हणून अतिरिक्त कार्यभार द्यायचा, असा मनसुबा रचण्यात आला आहे. त्यासाठी एका नगरसेवकाने जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. तत्कालीन आयुक्तांनी भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते त्याच्यासाठी ‘रेड कार्पेट’ अंथरण्याचा डाव महापालिकेत खेळला जात आहे. त्या पार्श्वभूमिवर सर्वांच्या नजरा नवनियुक्त आयुक्त संजय निपाणे यांच्याकडे लागला आहे. ते सेवानिवृत्तांची सेवा केवळ विवक्षित कामासाठी घेतला की पवारांप्रमाणे कंत्राटींकडे नियमित पदाचा कार्यभार सोपवितात, याकडे लक्ष लागले आहे.‘त्यांची’ही धडपडमहापालिकेत ‘रिएन्ट्री’ घेण्यासाठी इच्छुक असलेल्या ‘त्या’ अभियंत्याने पदाधिकाºयांची पायधूळ माथी लावणे सुरू केले आहे. ते अभियंता चार दिवसांपासून महापालिकेत दृष्टीस पडत असून, सेवानिवृत्तांच्या आड किंवा अन्य मार्गाने परतण्याची धडपड त्यांनी चालविली आहे.