विक्रीच्या प्रमाणात वाढ : तासभर ठिय्या आंदोलननांदगाव खंडेश्वर : शासनाने परवानाधारक दारूची अनेक दुकाने शहराबाहेर हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परवानाधारक दारूची दुकाने सद्यस्थितीत बंद असल्यामुळे गावात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. यामुळे स्थानिक महिलांनी अवैध दारू विक्री बंद करण्याकरिता तहसील कार्यालयावर धडक देऊन तासभर आंदोलन केले.स्थानिक शहरामध्ये हातभट्टीची व विविध प्रकारची अवैध दारूविक्री सर्रास सुरू असून गावामध्ये दारू विक्रीमुळे वाद-विवाद वाढले आहेत. याचा प्रचंड त्रास महिलांना सहण करावा लागत असल्यामुळे महिलांनी आज तहसील कार्यालयावर धडक देऊन १ तास ठिय्या आंदोलन केले. याचा प्रचंड त्रास महिलांना सहण करावा लागत असल्यामुळे महिलांनी आज तहसील कार्यालयावर धडक देऊन एक तास ठिय्या आंदोलन केले. यादरम्यान युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी चर्चेसाठी ठाणेदारांना बोलवण्याची मागणी केली आणि पोलीस स्टेशनचे ठाणेदार येणार नाही तोपर्यंत तहसील कार्यालयातून जाणार नाही, असा पवित्रा घेतल्यामुळे अखेर ठाणेदार रीता उईके यांनी तहसील कार्यालयात येऊन महिलांचे निवेदतन स्वीकारले. तातडीने दारू बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या निवेदनामध्ये गावातील सर्वच दारूची दुकाने गावाबाहेर २ किलोमीटर अंतरावर हटविण्याची मागणीसुद्धा केली असून, तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांनासुद्धा निवेदनाची प्रत देण्यात आली. यावेळी महिलांमध्ये ज्योती बनकर, चित्रा सूर्यवंशी, निर्मला भोयर, प्रतिभा अंभोरे, राजकन्या राठोड, चंद्रकला दुधे, लक्ष्मी सोळंके, निर्मला पाचखंडे, आशा इंगळे, सुनीता कुंभरे, नगरसेवक प्रमोद पिंजरकर, सीमा जाधव, उषा देशमुख युवा सेनेचे प्रकाश मारोटकर, नगरसेवक संजय पोकळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
दारूबंदीसाठी महिला तहसीलवर
By admin | Updated: April 8, 2017 00:17 IST