शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाच्या धडकेत मादी बिबट ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 23:52 IST

अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर रस्ता ओलांडताना एका तीन वर्षीय मादी बिबटाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री २ च्या सुमारास घडली.

ठळक मुद्देरात्रीची घटना : वनविभाग, फ्रेजरपुरा पोलिसांकडून वाहनाचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर रस्ता ओलांडताना एका तीन वर्षीय मादी बिबटाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी रात्री २ च्या सुमारास घडली.वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या अमरावती ते चांदूर रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात वन्यजीव रस्ता ओलांडतात. सोमवारी रात्री २ वाजताच्या सुमारास पोहरानजीक मेंढी फार्मजवळ रस्ता ओलांडताना एका मादी बिबटाला अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिल्याने ती जागीच ठार झाली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस.झेड. काझी, वर्तुळ अधिकारी विनोद कोहळे यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व पंचनामा नोंदविला. जबर धडक बसल्याने बिबट्याचे तोंड पूर्णपणे फाटलेले तसेच पुढील दोन्ही पाय पूर्णपणे निकामी झाले. धडकेच्या जागेपासून नंतर बिबट रस्त्यावर १३ फूट अंतरावर जाऊन पडला होता. याप्रकरणी वनगुन्हा क्र. ११/२२ जारी करण्यात आला. वर्तुळ अधिकारी विनोद कोहळे व फ्रेजरपुरा पोलीस वाहनांचा शोध घेत आहेत.शवविच्छेदनपोहरा मार्गावर ठार झालेल्या मादी बिबटाचे अमरावती येथे तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. यावेळी वनविभागाचे अधिकारी हजर होते.भडाग्नीबिबट हा अनुसूची १ चा प्राणी असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत वर्ग १ अधिकाºयांच्या उपस्थितीत उपवनसंरक्षक हेमंत मीणा, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. झेड. काझी यांच्यासमोर त्याला जाळण्यात आले.