शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मातोश्री डिस्ट्रीब्युटरवर एफडीएची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 00:07 IST

पंधरा दिवसांसाठी परवाना निलंबित केल्यानंतरही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या मातोश्री डिस्ट्रीब्युटवर अन्न व औषधी प्रशासनाने धाड टाकून सुमारे २ लाखांचा शेड्युल औषधी साठा जप्त केला आहे.

दोन लाखांचा औषधीसाठा जप्त : परवाना निलंबनानंतरही सुरू होता व्यवसायलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंधरा दिवसांसाठी परवाना निलंबित केल्यानंतरही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या मातोश्री डिस्ट्रीब्युटवर अन्न व औषधी प्रशासनाने धाड टाकून सुमारे २ लाखांचा शेड्युल औषधी साठा जप्त केला आहे. २७ जून रोजी झालेल्या या राजकमल चौकातील बग्गा मार्केटस्थित मातोश्री डिस्ट्रीब्युटरचा परवाना १५ ते २९ जूनपर्यंतच्या ालावधीकरिता निलंबित करण्यात आला होता. मातोश्री डिस्ट्रीब्युटर या व्यापारी प्रतिष्ठानात पोल्ट्री फार्मच्या पक्षांसाठी लागणारी औषधी विक्री केली जात होती. बडनेरा येथील रहिवासी संदीप ऊर्फ पंकज राजेंद्र दारोकार यांनी काही महिन्यापूर्वी पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांसाठी मातोश्रीमधून काही औषधी खरेदी केल्या होत्या. त्या औषधी पक्षांना दिल्यानंतर दारोकार यांच्या तब्बल ३ हजार कोंबड्या दगावल्या. मुदतबाह्य औषधींमुळे कोंबड्या दगावल्याचा आरोप दारोकार यांनी मातोश्री डिस्ट्रीब्युटरच्या संचालकावर केला होता. यासंदर्भात दारोकार यांनी १७ जानेवारी २०१७ रोजी अन्न व औषधी प्रशासनाकडे तक्रार नोंदविली. एफडीएच्या औषधी निरीक्षकांनी मातोश्री डिस्ट्रीब्युटरवरची तपासणी व चौकशीअंती त्यांना कारणे दाखवा नोटीससुद्धा बजावली होती. त्याअनुषंगाने मातोश्री डिस्ट्रीब्युटरचा परवाना पंधरा दिवसांकरिता निलंबित करण्यात आला. मात्र, दरम्यान मातोश्री डिस्ट्रीब्युटर प्रतिष्ठानातून औषधी विक्री होत असल्याची तक्रार दारोकार यांनी एफडीएकडे केली. त्याअनुषंगाने एफडीएचे प्रभारी सह आयुक्त प्रकाश शेंडे यांच्या मार्गदर्शनात औषधी निरीक्षक सी.के. डांगे व उमेश घरोटे यांनी मातोश्री डिस्ट्रीब्युटर प्रतिष्ठानात बनावट ग्राहक पाठवून औषधी खरेदी करण्यास सांगितले. या पडताळणीदरम्यान मातोश्रीमधून औषधी विक्री सुरूच असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार औषधी निरीक्षकांनी मातोश्रीवर धाड टाकून २ लाखांच्या शेड्युल औषधीचा साठा जप्त करून सिलबंद केला. आता पुढील कारवाई एफडीएमार्फत सुरु करण्यात आली. मातोश्रीला पुन्हा नोटीस बजावली जाणार आहे.