शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांनो, तुम्हीच एकत्र व्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:12 IST

‘सरसकट कर्जमाफी’ हा शेतकºयांचा अधिकार आहे, त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या गोष्टी निवडणूक प्रचारात केल्या होत्या.

ठळक मुद्देशांताराम वाळूंज : किसान संघर्ष यात्रेचे कौंडण्यपुरात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्ककुºहा : ‘सरसकट कर्जमाफी’ हा शेतकºयांचा अधिकार आहे, त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या गोष्टी निवडणूक प्रचारात केल्या होत्या. पण अद्यापपर्यंत असे काही झाले नाही. देशातील मोदी व राज्यातील फडणवीस सरकार फक्त शेतकºयांना फसविण्याचे काम करीत आहे. यामुळे विखुरलेल्या शेतकºयांनो, तुम्ही एकत्र झाले तरच सरकार नरमेल, असे आवाहन किसान नेते शांताराम वाळूंज यांनी केले.संपूर्ण महाराष्ट्रात शेतकºयांच्या कर्जमाफीबाबत जनजागृती करणारी किसान सभेने काढलेली किसान संघर्ष यात्रा शनिवारी अमरावती जिल्ह्यात कौंडण्यपूर येथे दाखल झाली आणि जिल्ह्याच्यावतीने येथे यात्रेचे स्वागत करण्यात आले.यावेळी कुºहा येथील सुमेरसिंग नाहाटे सभागृहात जाहीर सभा घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, ३४ हजार कोटींची कर्जमाफी घोषणा केली पण त्यात घातलेल्या जाचक अटीमुळे शेतकºयांसोबत त्याची पत्नी व कुटुंबाची ससेहोलपट होत आहे. योजनेला शिवाजी महाराजांचे नाव देऊन त्यांचा रयतेला त्रास देण्याचा प्रकार सद्य देशात सरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.यावेळी अशोक सोनारकर, डॉ.महेश कोपुलवार, लक्षण ढाकळे, शाहीर धम्म खडसे, विजय रोडगे, गंगाधर खेडकर यांच्यासह शेतकरी शेतकरी उपस्थित होते.चांदूररेल्वेत आतशबाजीमहाराष्ट्र राज्य किसान संघर्ष समितीच्या किसान यात्रेचे चांदूररेल्वे येथे जुना मोटर स्टँड चौकात शेतकºयांनी स्वागत केले. यावेळी शेतकºयांनी आतषबाजी केली. स्वामिनाथन आयोग लागू करा, सरसकट कर्जमाफी द्या, असे फलक हाती घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. किसान संघर्ष यात्रेचे नेतृत्त्व अशोक सोनारकर, शांताराम वाळूज करीत आहेत. यावेळी त्यांनी सरकारच्या कर्जमाफीचा खरपूस समाचार घेतला.