शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना अनुदानावर मिळणार कृषियंत्र, अवजारे

By admin | Updated: July 24, 2016 00:09 IST

राष्ट्रीय अन्न सुरषा व कृषि यांत्रिकीकरण या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे व साहित्याचा लाभ देण्यात येणार आहे.

दिलासा : राष्ट्रीय अन्न सुरक्षा, कृषी यांत्रिकीकरण अभियानअमरावती : राष्ट्रीय अन्न सुरषा व कृषि यांत्रिकीकरण या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी अवजारे व साहित्याचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित तालुका कृषि अधिकाऱ्यांकडे संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.जिल्ह्यात प्राप्त लक्षांकानुसार शेतकऱ्यांना पॉवर, नॅपसॅक स्प्रेपंप, बहुपीक पेरणी लागवड यंत्र, ट्रॅक्टरचलीत पेरणी यंत्र रोटाव्हेटर, बहुपिक पेरणी मळणी यंत्र, तुषार संच, पंपसंच, पाईप (पिव्हीसी व एचडीपीई) कल्टीव्हेटर, गादीवाफा लागवड यंत्रण, बीबीएफ यंत्र व सरी वरंबा लागवड यंत्र याचा अनुदानावर लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. शेतकरी लाभार्थींना महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे कृषी अधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीनुसार २० दिवसाच्या आत पूर्ण रक्कम भरून खरेदी करावी लागणार आहे. देयकासह प्राप्त अहवालानुसार अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.कृषी यांत्रिकीकरण उप अभियानांतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार व मागणीप्रमाणे शासनाने निवड केलेल्या उत्पादकांची कृषियंत्रे अनुदानावर देण्यात येतील. यामध्ये ट्रॅक्टर, औजारे, पिक संरक्षक उपकरणे, प्रक्रिया सयंत्रे, ही अनु. जाती, जमाती व अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना किंमतीच्या ३५ टक्के किंवा जास्तीत जास्त १ लाख २५ हजार व इतर शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा जास्तीत जास्त ७५ हजार ते १ लाख अनुदान देय आहे. कृषी अवजारासाठी अनु. जाती, जमाती, अल्प, अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला शेतकरी यांना किंमतीच्या ५० टक्के व ईतर शेतकऱ्यांना ४० टक्के अनुदान देय आहे. (प्रतिनिधी)