शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

- तर शेतकरी कुटुंबीयांसह आत्महत्या करतील

By admin | Updated: August 31, 2016 00:06 IST

यवतमाळ व अमरावती जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी सर्वदूर गाजत असताना...

वीरेंद्र जगताप यांचे भाकित : नागपूर- मुंबई संचार द्रुतगती महामार्गाला विरोधअमरावती : यवतमाळ व अमरावती जिल्हा शेतकरी आत्महत्यांनी सर्वदूर गाजत असताना या जिल्ह्यातील काही गावांमधून नागपूर - मुंबई संचार द्रुतगती महामार्ग निर्मितीचा हट्टहास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. या महामार्ग निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे कल्याण होईल. महाराष्ट्र देशात सर्वात पुढारलेले राज्य बनेल, असे स्वप्न मुख्यमंत्री दाखवीत आहे. मात्र दोन, चार एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या महामार्गामुळे प्रकल्प बाधित होऊन कुटुंबीयांसह सामूहिक आत्महत्या करावी लागेल, असे भाकीत आ. वीरेंद्र जगताप यांनी वर्तविले आहे. मात्र, काहीही झाले तरी मतदार संघातून या महामार्गाची निर्मिती होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.आ. वीरेंद्र जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, यवतमाळ जिल्ह्यात आॅगस्ट महिन्यात ३६ आत्महत्या झाल्याची नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील शेलू येथील शेतकरी पिता-पुत्रांनी नापिकी, आर्थिक विवंचना आणि कर्जाला कंटाळून एकाच झाडाला दोघांनी गळफास लावून जीवनयात्रा संपविली आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूर - मुंबई शिघ्र संचार द्रुतगती महामार्ग निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे जगणे सुकर होणार असे स्वप्ने दाखवीत आहेत. दोन, चार एकर शेतीच्या भरोवशावर शेतकऱ्यांचे जगणं असताना ते या महामार्ग निर्मितीसाठी ताब्यात घेतल्यास प्रकल्पग्रस्तांना बाधित व्हावे लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी महामार्ग निर्मितीचा अट्टाहास केल्यास प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना कुटुंबीयांसह सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रसंग ओढवणार याचे भान मुख्यमंत्र्यांनी ठेवावे, असे आ. वीरेंद्र जगताप यांचे म्हणणे आहे. महामार्ग निर्मितीच्या सर्वेक्षणानुसार धामणगाव तालुक्यातील आष्टगाव येथून या महामार्गाची सुरुवात होणार आहे. याला आष्टगाववासियांचा विरोध आहे. तसेच २०१३ च्या भूमिअधिग्रहण कायद्यातील तरतुदीनुसार शेतकऱ्यांच्या संमतीचा नियम लक्षात घेतला जात नाही. तरीदेखील मुख्यमंत्री या महामार्गाच्या निर्मितीसाठी आग्रही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ही तर राज्य शासनाची हुकूमशाहीच आहे, असा आरोप आ. जगताप यांनी केला.नव्या भूमिअधिग्रहण कायद्यानुसार शेतकरी भागिदारीच्या (पीपीपी) प्रकल्पांसाठी ७० टक्के बाधित शेतजमीन मालकांची संमती कायदेशीर आवश्यक आहे. मात्र शेतकऱ्यांच्या भागिदारीबाबत मुख्यमंत्र्यांकडे कोणतेही उत्तर नाहीत. किंबहुना प्रशासकीय अधिकारी यासंदर्भात मोकळेपणे बोलत नाही. त्यामुळे या महामार्ग निर्मितीत नेमके दडले काय? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणी आ. जगताप यांनी केली आहे. या महामार्गाला समांतर नागपूर- जालना- औरंगाबाद आणि नागपूर- मुंबई महामार्ग क्र. ६ असताना नवीन महामार्गाच्या निर्मितीसाठी मुख्यमंत्र्यांचा अट्टाहास का, असा प्रश्न आ. वीरेंद्र जगताप, तुकाराम भस्मे, केशवराव तांदुळकर, भानुदास मंदुरकर आदी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)विभागीय आयुक्तालयावर १४ सप्टेंबर रोजी धडकनागपूर - मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग शिवणी रसुलापूर येथून निर्मित करू नये, यासाठी सर्वपक्षीय अधिग्रहण विरोधी संघर्ष समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत अमरावती, वाशीम व बुलडाणा येथील शेतकरी, शेतमजुरांचा सहभाग करण्यात आला आहे. महामार्ग निर्मितीस विरोध दर्शविण्यासाठी १४ सप्टेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक देऊन शेतकरी भूमिअधिग्रहणाला विरोध करणार असल्याचे आ. वीरेंद्र जगताप यांनी कळविले आहे.