शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची भटकंती सुरूच

By admin | Updated: June 19, 2015 00:41 IST

मृग नक्षत्राची सुरुवात झाली असली तरी शेतातील कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. कारण मागील वर्षी खरीप, ....

कावली वसाड : मृग नक्षत्राची सुरुवात झाली असली तरी शेतातील कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत. कारण मागील वर्षी खरीप, रबी पीक उत्पादनासाठी लावलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला. आता शेती कशाच्या भरवशावर करावी, हा प्रश्न पडला आहे. तरीदेखील शेतकरी खासगी सावकाराचे उंबरठे झिजवीत आहेत. आज ना उद्या मार्ग सापडेल आणि खरिपाची पेरणी होईल, या आशेवर शेतकऱ्यांची भटकंती सुरु आहे.भारत हा कृषीप्रधान देश असला तरी शेतकरी पूर्णत: आर्थिकदृष्ट्या खचून गेला आहे. शासनाचे धोरणही शेतकरीविरोधी असून व्यापारी आणि उद्योजकाच्या हिताचे असल्याची ओरड ग्रामीण भागात होत आहे.हाडाचे पाणी करुन काबाडकष्ट करून तसेच उधार, उसणवारीने पैसे आणून मागील वर्षी पेरणी केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीला लावलेला खर्चसुद्धा निघाले नाही आणि उरल्या-सुरल्या मालाला भावही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणलेल्या कर्जाचीदेखील परतफेड करणे शक्य झाले नाही. आता बी-बियाणे आणावे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात खासगी सावकारांकडे धाव घेऊन व्याजाने पैसे आणल्याचे समजते.शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात शेतकरी अधिक प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे खासगी अवैध सावकारही आहे. मात्र याची वाच्यता केली जात नाही. कारण आपल्या शेतीला पैसा दिला कोण्या संबंधाने, हे अधिकाऱ्याला किंवा सामाजिक काम करणाऱ्याला सांगितले तर आपले काम होणार नाही. त्यामुळे शेतकरी व्याजाच्या दरात मोठ्या प्रमाणात भरडला जात असल्याचे ग्रामीण भागाचे चित्र आहे.मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागत आहे. कधी उत्पन्न होते. परंतु भाव मिळत नाही आणि भाव मिळाले तर उत्पन्न कमी, पिकांची स्थिती चांगली तर निसर्ग साथ देत नाही, अशा परिस्थितीतून शेतकऱ्याला वाट काढवी लागत आहे. त्यामुळे अवैध सावकारी कर्जाचा डोंगर वाढतो आहे. कारण मागील उधारी परत न केल्याने यावर्षी कर्जही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे ते संकटात आहेत.